Home Breaking News वाडेगावच्या मुलीचा खो.खो संघ विजयी

वाडेगावच्या मुलीचा खो.खो संघ विजयी

योगेश घायवट बाळापूर तालुका प्रतिनिधी 

वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांच खोखो स्पर्धेत मुलीचा संघ विजयी झाला .
२२ व २३ फेब्रुवारी रोजी वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे जिल्हा परिषद शाळांचे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडेगाव मुले येथील विद्यार्थिनींनी सीनियर विभाग मुली या विभागात विजेते पद पटकावले, तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी मुली द्वितीय क्रमांक कु.अंजली जंजाळ, १००मीटर दौड शिवा वाघमारे तृतीय क्रमांक, 400 मीटर दौड कुमारी अर्पीता इंगळे तृतीय क्रमांक अशाप्रकारे कामगिरी केली आहे. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक समाधान सोर, पुंडकर,घाटोळ, मसने, धोत्रे, राठोड ,गाडगे सर ,जढाळ सर ,खोपे मॅडम, जोशी मॅडम, देशमुख मॅडम तसेच इतर शिक्षकांना जाते.या सर्व विजयी खेळाडूचे परिसरात कौतुक होत आहे..

Previous articleजिल्हा कृषी महोत्सवात सवना येथील शिंदे पाटलांचे कौतुक……..
Next articleसंजयभाऊ चाभरेकर यांचा कृषि महोत्सवात सपत्नीक गौरव!