👉 यशोगाथा कष्टकरी शेतकऱ्यांची…….🍉
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 03 मार्च 2023
महाराष्ट्र शासन नांदेड जिल्हा कृषी महोत्सवात विशेषतः ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची यशोगाथा विशेषत्वाने पाहवायास मिळाली.
त्यातील काही हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथील शेतकरी ग्यानोबा शिंदे पाटील यांनी कलींगड ( टरबुज) या फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. एक एकर क्षेत्रावर त्यांनी नियोजित लागवड केली असुन, आजपर्यंत २० ते२२ टन माल विक्री केलेला आहे. एक नग ९ ते १० किलो प्रमाणे भरला असुन, एक एकर शेतीत त्यांनी लाखोंचे उत्पादन मिळविले आहे.
यातच ते समाधानी नसुन, नांदेड जिल्हा कृषी महोत्सवाविषयी आमचे मित्र मारोती अक्कलवाड यांच्याकडुन माहिती मिळाली आहे. म्हणून मी नांदेड जिल्हा कृषी महोत्सवात टरबुज एक क्विंटल विक्री करण्यासाठी आणले असता, अवघ्या दोन तासात सर्व टरबुज विक्री झाले आहेत. म्हणून शेतकरी बांधवांनी खचुन न जाता बाजारात काय? विकते याचा अभ्यास करण्यासाठी कृषि विभागासी संपर्क साधावा असेही पाटील म्हणाले. मी गेल्या दोन वर्षांपासून कलींगड ( टरबुज) लागवड करत असुन मला कृषि सहाय्यक नंदनवार साहेब, ता. कृ. अ. जाधव सर, आमचे मित्र अक्कलवाड पाटील आदी कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
👉 हिमायतनगर, भोकर तालुका कृषी अधिकारी यांनी केले कौतुक….
शिंदे पाटील यांच्यासहित कृषि महोत्सवातील सर्व अनुभवी शेतकऱ्यांकडून ईतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा.
तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब, भोकरचे तालुका कृषी अधिकारी गिते साहेब यांनी शिंदे पाटील यांचे कौतुक करुन, कलींकडही स्वःता खरेदी केले आहेत. यावेळी दिलीप जाधव साहेब, ता. कृ. अ. गिते साहेब ता. कृ. अ भोकर, प्रा. ढगे, सौ. ढगेताई , कृ.स. नंदनवार, कृ. स. माझळकर, कृ. स. दिगांबर खुपसे, यांच्यासह कृ. स. साबळे, कृ. स. अमृते, कृ. स. राजुरकर, प्रगतशिल शेतकरी संजयभाऊ चाभरेकर, बोईनवाड, घुमलवाड, समुह सहाय्यक साईनाथ अनछत्रे, यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.