Home Breaking News खामगाव पंचायत समिती मधील कृषी विभागाचे कार्यालय हे कार्यालयीन वेळेतही बंद.

खामगाव पंचायत समिती मधील कृषी विभागाचे कार्यालय हे कार्यालयीन वेळेतही बंद.

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी

खामगाव :-पंचायत समिती अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शासनाकडून राबविण्यात येत असतात मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. असाच काही प्रकार खामगाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कृषी विभागामार्फत अनेक दिवसांपासून सुरू आहे या कृषी विभागामार्फत जुनी विहीर दुरुस्तीसाठी अनुदान मिळते नवीन विहीर बांधणीसाठी अनुदान मिळत असते या व अशा अनेक कृषी उपयोगी योजना या कार्यालया अंतर्गत सुरू असतात पण या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक शेतकरी या योजना पासून वंचित राहत आहेत अनेक वेळा हे कार्यालय कार्यालयीन वेळेतही अधिकाऱ्या विना असते कधी.कधी दरवाजा बंद केलेला असतो त्यामुळे खेडे विभागातून आलेले शेतकरी हे दरवाजापर्यंत जातात व दरवाजा बंद असल्यामुळे परत फिरत असतात यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना शेतकरी फोनही करतांना दिसतात परंतु अधिकारी फोनही उचलत नाहीत व त्या शेतकऱ्याला उत्तरही देत नसल्यामुळे त्या शेतकऱ्याकडे दुसऱ्या दिवशी त्या कामासाठी यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. सध्या पंचायत समिती. व जिल्हा परिषद च्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्याने पंचायत समितीवर व जिल्हा परिषद वर अधिकारी राज सुरू असल्याने या बेजबाबदार पणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही मात्र यामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हा त्रास सहन करावा लागत आहे अशा बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

Previous articleनाशिक मध्ये 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घघा टन
Next article. *‼️ तर थकवा येणारच ‼️*