Home Breaking News नाशिक मध्ये 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घघा...

नाशिक मध्ये 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घघा टन

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070

महाकवी कालिदास कलामंदिरात 61 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी स्पर्धाना प्रारंभ झाला. या उद्धघाटन प्रसंगी नाट्यसेवा मंडळा चे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाशिक अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जातेगावकर म्हणाले राज्य नाट्य स्पर्धा करीता प. सा. नाट्यगृहातील खुर्च्याचे काम प्राधान्याने करण्यात येत असून इतरही सोयी करण्यात येत आहे. त्यामुळे रंगकर्मीना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले व प. सा. नाट्यगृहात रसिक नाटकाला येती ल अशी अपेक्षा व्यक्त केली. तर प्रा. कदम म्हणाले की, राज्यांतील विविध विभागातील नाटके बघण्याची संधी यानिमिताने नाशिकरांना मिळाली आहे, त्यामुळे तमाम रंगकर्मीनी या नाटकांचा अस्वाद घ्यावा, असे नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर परीक्षक डॉ. संयुक्ता थोरात, राज कुबेर, वासुदेव विष्णूपूरीक, रविंद्र अमोणकर, सुरेश गायधनी, शासनाचे कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ उपस्थित होते.
पहिल्या दिवशी नाटकाची नांदी म्हणून बागेश्री वृदा तर्फे जय गिरीजापती गैारी शंकर ही नांदी चारुदत्त दीक्षित आणि महिला समुहाने सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी केले. दरम्यान सकाळी 8 वाजता स्पर्धा ज्यांच्या पुढाकाराने नाशिक ला होत आहे, त्या मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्तेही रंगमंच व नटराज पूजन करण्यात आले. तर माजी उप महापौर प्रथमेश गिते यांच्या तर्फे प्रत्येक संघाला मानचिन्ह देऊन गैारविण्यात येणार आहे.
राज्य नाट्य च्या अंतिम फेरी त पहिल्या दिवशी ‘युथ फोरम ‘ देवगड या संस्थे स्वप्निल जाधव लिखित, दिग्दर्शित ‘ निर्वासित ‘हे नाटक सादर करीत स्पर्धाना सुरुवात केली.
शहरात नाटकांचे वातावरण रहावे यासाठी कालिदास कला मंदिर व प. सा. नाट्यगृह या दोन्ही नाट्यगृहाच्या आवारात नाट्य पंढरी उभारण्यात आली आहे. एका ठिकाणी कुसुमाग्रज नाट्यपंढरी तर दुसऱ्या ठिकाणाला वसंत कानेटकर नाट्य पंढ़री असे नाव देण्यात आले असून या ठिकाणी शिल्पकार वरुण भोईर, श्रेयस गर्गे आणि इतर शिल्पकारांच्या मदतीने विविध शिल्पे ठेवण्यात आली आहे. शिवाय येथील भिंतीविविध नाटकांची छायाचित्रे लावण्यात ये ऊन परिसर सजविण्यात आला आहे.ौ

Previous articleफितूर झालेले गद्दार शिवसेनेच्या मुळावर उठले – सुषमा अंधारे
Next articleखामगाव पंचायत समिती मधील कृषी विभागाचे कार्यालय हे कार्यालयीन वेळेतही बंद.