Home Breaking News फितूर झालेले गद्दार शिवसेनेच्या मुळावर उठले – सुषमा अंधारे

फितूर झालेले गद्दार शिवसेनेच्या मुळावर उठले – सुषमा अंधारे

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी

खामगाव : ५० खोके घेवून गद्दार झालेले व स्वता:ला खरे शिवसैनिक म्हणवून घेणारे आज शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. जेव्हा देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस तसेच शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वैमनस्य देखील जनतेस सर्वश्रुत होते. तेव्हा देखील शिवसेना संपविण्याचा विचार कोणी केला नाही. परंतु, ज्यांच्या जिवावर मोठे झाले तेच फितूर होवून आता तेच गद्दार शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. परंतु, खोके घेवून गदार झालेल्यांनी कितीही हल्ला केला तरी ठाकरेंचा किल्ला हा मजबूत आहे, असे सांगत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खामगाव येथील जाहीर सभेत भाजप, शिंदे सरकार तसेच जिल्ह्यातील शिंदे गट व जिल्ह्यातील आमदारांवर हल्लाबोल करीत त्यांचा समाचार घेतला.

शिवगर्जना सप्ताहानिमित्त सध्या शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते महाराष्ट्र भर दौरे करीत असून, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या विदर्भ दौऱ्यावर असून काल दि. १ मार्च रोजी खामगाव येथील गांधी चौकात सायंकाळी ५ वाजता त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या शिवसैनिकांना संबोधित करीत होत्या. यावेळी मंचावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुखवसंतराव भोजने, जालीघर बुधवत, शिव उद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तायडे, शिवसेना तालुका अध्यक्ष बंडु बोदडे, खामगाव विधानसभा संघटक रवि महाले, शहर प्रमुख विजय इंगळे, कृउबासचे माजी संचालक श्रीराम खेलदार यांचेसह महाविकास आघाडीतील काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहाण, माजी नगराध्यक्ष गणेश माने, अशोक हटकर व जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिदे असून, राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या राज्याची अस्मिता असलेल्या अनेक महापुरुषांबद्दल अपशबद्दल काढले परंतु, शिंदे त्यांच्या विरुध्द कधीच काही बोलले नाही. भाजपसोबत गेलेल्या सर्व चाळीस आमदारांची काही ना काही गोम आहे. त्यामुळेते केवळ फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करतात. मग ते महाराष्ट्राच्या हिताचे असो वा नसो. अंधारे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर व संजय गायकवाड यांच्या बद्दल बोलतांना म्हणाल्या की, या तिघांना मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याला खोक्यांच्या ओळखीशी जोडले असून, यांना जनता कधीही माफ करणार नाही. सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत असतांना हे चुन चुन के मारेंगे ची भाषा करतात. तर खासदार म्हणतात महागाई कुठे वाढली खर्च वाढला आहे. त्यामुळे या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेच्या फुटीनंतर खामगावात ही पहिलीच सभा असल्याने सुषमा अंधारे यांना ऐकण्यासाठी नागरिकांनी सभास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Previous articleश्री परमेश्वराच्या यात्रेत कबड्डीचे सामने सुरू.
Next articleनाशिक मध्ये 61 व्या राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घघा टन