वाडेगाव प्रतिनिधी,
बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा वाडेगाव बाळापुर वेस येथील शेतकरी पुत्राची इलेक्ट्रीकचा शॉक द्वारे आत्महत्या केल्याची घटना दि २६ फेब्रुवारी रोजी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
येथील शेतकरी गोविंदराव हरिभाऊ सरप हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंब पारंपारीक पध्दतीने शेती करतात मात्र दोन तीन वर्षापासुन सतत नापिकी होत असल्याने त्यांच्याकडे बॅंकेचे पिककर्ज थकीत होत गेले. या बँकेच्या कर्जामुळे शेतकरी पुत्र गणेश गोविंदराव सरप हा नेहमीच विवंचनेत वावरत होता. या मानसिक त्रासामुळे आज रोजी स्वतःच्या घरातील इलेक्ट्रीक करंटला हात लावुन आत्महत्त्या केल्याची घटना निदर्शनास आली आहे. अशी चर्चा गावातील नागरीक करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा तसेच आप्तपरिवार आहे. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत.