Home Breaking News जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा-

जिल्‍हास्‍तरीय कृषि महोत्‍सवामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा-

👉जिल्हाधिकारी अभिजित राऊत

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 26 फेब्रुवारी 2026

मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्‍त व आंतराराष्‍ट्रीय पौष्टिक तृणधान्‍य वर्ष 2023 हे औचित्‍य साधून कृषि विभाग व आत्‍मा यांच्या संयुक्‍त विद्यमाने “नांदेड जिल्‍हा कृषि महोत्‍सवाचे’’ आयोजन 1 ते 5 मार्च 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे. या महोत्‍सवास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा तसेच जास्तीत जास्त ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
या महोत्सवाचे आयोजन सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे करण्‍यात येणार आहे. या कृषि महोत्‍सवात शासकीय 30 स्टॉल, कृषि निविष्ठा 20 स्टॉल, कृषि तंत्रज्ञान व सिंचन 20 स्टॉल, खाद्य पदार्थ 20 स्टॉल, कृषि प्रक्रिया 10, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गट 100 स्टॉल असे एकुण 200 स्‍टॉल उभारण्‍यात येणार आहेत.कृषि तंत्रज्ञान व सिंचन,कृषि निविष्ठा या खाजगी स्टॉलसाठी नाममात्र रु.5000 भाडे आकारण्यात येणार आहे.तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,महिला बचत गट,शासकीय व निमशासकीय कार्यालये यांच्यासाठी स्टॉल नि:शुल्क आहेत.
शासकीय स्‍टॉल बुकिंगसाठी श्री.एस.बी.बोरा मो.क्र.9422752817, कृषि निविष्ठा साठी श्री.हुंडेकर मो.क्र.9049150631, कृषि तंत्रज्ञान व सिंचन श्री.व्ही.जे.लिंगे मो.क्र.7066105384, शेतकरी गट व उत्पादक कंपनी साठी श्रीहरी बिरादार मो.क्र.8275556316 व श्री महेश तहाडे मो.क्र.9923405166 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

Previous article।। दारिद्रयातील मैना ।।
Next articleस्वर्गीय धोंडीबा कांबळे आठदिवसा पुर्वी रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडले.