Home Breaking News महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे नाशिकला प्रथमच संधी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा...

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे नाशिकला प्रथमच संधी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

1 मार्चपासून नाशिक मध्ये 40 नाटकांची रंगणार राज्यस्तरीय अंतिम फेरी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे होत असलेल्या 61 व्या राज्य मराठी हौशी नाट्य स्पर्धाची अंतिम फेरी नाशिक मध्ये प्रथमच रंगणार आहे. राज्य नाट्यची अंतिम फेरी प्रथमच नाशिक मध्ये होत असल्याने रंगकर्मीमध्ये उत्साह संचारला आहे.
राज्यभरातील विविध केंद्रावर प्राथमिक फेरीत प्रथम, द्वितीय आलेल्या नाटकांची व नाशिक व रत्नागिरी केंद्रावरील प्रत्येकी 3 नाटकांची ही अंतिम फेरी 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान महाकवी कालिदास कलामंदिर आणि प. सा. नाट्यगृहात होणार आहे.कालिदास कला मंदिर येथे 4 ते 7 व प. सा. येथे 8 ते 11 या या वेळे मध्ये हे नाट्य प्रयोग होणार आहे.
विशेष म्हणजे नाशिक मध्य च्या आमदार देवयाणी फरांदे यांच्या पुढाकाराने नाशिकला प्रथमच अंतिम फेरी आयोजनाची संधी मिळाली आहे. आयोजना करीता समिती सदस्यांची कमिटी करण्यात आली आहे.
राज्य नाट्य स्पर्धाच्या अंतिम फेरीच्या नाट्य मेजवाणीचा लाभ सर्व नाट्य रसिकांनी आवर्जुन घ्या वा असे आवाहन राजेश जाधव समन्वयक राज्य नाट्य स्पर्धा यांनी केले आहे.

Previous articleनाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे* *सक्षम ग्राहक जागरूकता मंचला‘कार्यसन्मान पुरस्कार’ जाहीर*
Next articleTISS SVE कडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याबद्दल तक्रार .