Home Breaking News नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे* *सक्षम ग्राहक जागरूकता मंचला‘कार्यसन्मान पुरस्कार’ जाहीर*

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे* *सक्षम ग्राहक जागरूकता मंचला‘कार्यसन्मान पुरस्कार’ जाहीर*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

प्रतिनिधी (दि. २२ फेब्रु.) : नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे ग्राहक हक्क व संरक्षण कायदा व ग्राहकहिता विषयी प्रबोधन व जनजागृतीसाठी सातत्यपुर्ण अविरत कर्तुत्वाचा गौरव म्हणून यंदाचा ‘कार्यसन्मान पुरस्कार’ नेक्स्टजन फाउंडेशन संचालित सक्षम ग्राहक जागरूकता मंच ला जाहीर करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
सदर पुरस्कार सन्मान सोहळा रविवार, दि. २६ फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी १० वाजता के.जे. मेहता कॉलेज सभागृह, नाशिकरोड येथे मोठ्या थाटात पसंपन्न होणार असून, हा सन्मान स्वीकारण्यासाठी सक्षम ग्राहक मंचच्या सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे निमंत्रण नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे यांनी दिले.

Previous articleखा. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश सुरुच….
Next articleमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे नाशिकला प्रथमच संधी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय