अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हदगाव-हिमायतनगर या तालुक्यातील सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि आ.श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी या सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करत त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटतालीकरिता शुभेच्छा दिल्या व तसेच आपण सर्व कार्यकर्त्यांनी खा. हेमंत भाऊ पाटिल व लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या पाठिशी राहुन आपल्या भागातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, व तळागाळातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र मेहनत करून त्यांना मदत करा आशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या नांदेड जिल्ह्यासह हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा.हेमंत पाटील, युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य अमित गीते यांच्यासह सतीश पाटील पांगरीकर, संदेश पाटील, सरपंच अँड. बाळा पतंगे, सरपंच मल्हारी सोळंके, शितल भांगे पाटील, जोतिबा भांगे, दुर्गा भारती, पोर्णिमा हत्तीनगरे आणि अंजली सोनुले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला ..