Home Breaking News देशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे…… ऐड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

देशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे…… ऐड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

वाडेगांवात हजारोच्या संख्येत जनसमुदाय  “न भुतो ना भविष्यती” अशी ओ. बी. सी. ऐतिहासिक परिषद वाडेगांवात संपन्न

योगेश घायवट तालुका प्रतिनिधी:-              ऐतिहासीक परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठा वाटा गोपालभाऊ राऊत . बालमुकुंद भिरड. ऐड. संतोष राहटे यांचा असून त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मंडळी यांचाही वाटा आहे.

वाडेगांव:- आज देशात खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून फक्त हिंदू खतरे मे है और इस्लाम खतरे है असे म्हणत देशात फसवणूकीचे राजकारण सूरू आहे ही फसवणूक समुहामध्ये एकमेकांबद्दल व्देष निर्माण करत असल्याची वस्तुस्थिती आहे. आज कोणताही धर्म धोक्यात नसून माणूस धोक्यात असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऐड. प्रकाश आंबेडकर यांनी वाडेगांव येथे झालेल्या ओबीसी ऐतिहासिक परिषदेत केले.
पंढरपूर मधून जात असलेल्या संमृध्दी महामार्ग कशा प्रकारे पंढरपूरात येनारे भाविक्तांना अडथळा करणार आहे हे ही त्यांनी सांगितले. ओबीसी ची जातीनिहाय जनगणना झाली पाहीजे व अत्यल्प समाजाचे हित जोपासण्याकरीता ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगांव यांच्या वतीने ऐतिहासिक परिषद 2023 चे आयोजन सोमवार 20 फेब्रुवारी रोजी वाडेगांव येथील अवलिया अर्जुन महाराज संस्थान येथे करण्यात आले होते. या ऐतिहासिक परिषदेचे मुख्य मार्गदर्शक तथा उद्घाटक म्हणून ऐड. प्रकाश आंबेडकर होते. या परिषदेचे अध्यक्ष गोपालभाऊ राऊत. स्वागताध्यक्ष बालमुकुंद भिरड तर परिषदेचे ऐतिहासिक ठराव वाचन ऐड संतोष राहटे यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. अंजली आंबेडकर. रेखा ठाकूर. निलेश विश्वकर्मा . अशोक सोनोने. महेश निनाळे. डां. सुदर्शन भारती. डां. दिपक मस्के. फारूख अहमद. सचीन डोरले. राजेश पंडित. सोमनाथ साळुंके. गोविंद दळवी. नागोराव पांचाळ. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर. राजेश पातोडे. अरूंधती शिरसाट तसेच प्रमोद देंडवे. मिलींद इंगळे. जि.प. अध्यक्ष संगिता अढाऊ. जिप उपाध्यक्ष सुनिल फाटकर. जिप सभापती माया नाईक. योगिता रोखडे. रिजवाना परवीन. शेख मुक्तार. ज्ञानेश्वर सुलताने. प्रा. संतोष हुसे. इमरान खान. आकाश सिरसाट. रूपाली शाहने.मुस्ताक. दिपक बोडके. धनंजय दांदळे. गजानन वाघमारे. विकास सदाशिव. डां. शैलेश सोनोने. पराग गवई. शामलाल लोध. प्रकाश कंडारकर. सूधिर कोल्हे. राजेश्वर पळस्कार. जिवन गिरी. चेतन कारंजकर. नारायण कंडारकर. अंकुश शहाणे. मनोज सोनोने. राजेश धनभर. ऐड राहुल लोध. राधेश्यम कळसकार. दिनेश पेठे. प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव. पराग गवई. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी सहकार्य केले. विक्रम शर्मा. डां. शेख चांद .सुमेध अंभोरे यांनी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी सहकार्य केले

Previous article
Next articleपत्रकार श्याम बहुरूपे यांना मातृशोक