योगेश घायवट तालुका प्रतिनिधी भुमीराजा बाळापुर
आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात येते की ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटना वाडेगांव यांच्यावतीने ऐतिहासिक परिषद आयोजित करण्यात आली. हि ऐतिहासिक दि. 20 फेब्रुवारी 2023 ला सकाळी 10:00 वाजता स्थळ अवलिया अर्जुन महाराज संस्थान वाडेगांव ता. बाळापूर जि. अकोला येथे आहे. बहुजनांचे दिपस्तंभ श्रध्देय श्री अॅड बाळासाहेब आंबेडकर हे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असुन
या ऐतिहासिक परिषदेत ओबीसींची जनगणना व्हावी तसेच ओबीसी व अत्यल्प समाजातील जनकल्याणाचे विविध ऐतिहासिक ठराव पारित करण्यात येणार आहे. या परिषदेचे भव्यदिव्य नियोजन करण्यात आले असुन या परिषदेला जिल्हाभरातुन हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती असेल. करिता आपणही आपल्या सहकाऱ्यांसह या परिषदेच्या यशस्वीतेसाठी चित्रीकरण व वृत्तांकन करावे व आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ओबीसी व अत्यल्प समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा हि नम्र विनंती.
गोपाल राऊत
कार्यक्रमाचे अध्यक्ष
बालमुकुंद भिरड
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष
अॅड संतोष राहाटे
ऐतिहासिक ठराव वाचक
विकास सदांशिव
प्रसिध्दी प्रमुख
ऐतिहासिक परिषद 2023 वाडेगाव