जिल्हा संपादक नांदेड दिनांक- १५ जानेवारी २०२३
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथे 6 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह चालु असून 12 फेब्रुवारीला मारोती मंदीराच्या प्रांगणात 55 युवकांनी रक्तदान केले आहे. गेल्या सहा दिवसा पासून सकाळ, संध्याकाळ महाप्रसाद यज्ञ चालु असल्याने, गावची चुल पेटली नाही. 12 फेब्रुवारीलाला अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा निमित्य मारोती मंदीर समोर रक्तदान शिबीराचे उदघाटन डाॅ. भाले, डाॅ. आनंद लोणे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी गावातील प्रतिष्ठीत रामचंद्र पाटील, सुभाष बलपेलवाड यांच्या हस्ते संपन्न झाले . या प्रसंगी जयवंत पाटील संट्टी कप्पलवाड, गणेश पाटील, डाॅ. बालाजी मिराशे, अवधूत तमलवाड, साई कप्पलवाड, बबलू पाटील, अवधूत गोसलवाड, प्रदिप गायकवाड पाटील, शिवराम लिंगमपल्ले, मारोती पाटील आदीसह उपस्थित होते. रक्तदान शिबीर पहिल्यांदाच पवना गावात होत असून, रक्त संकलन गुरु गोविंदसिंग ब्लड बॅकने केले आहे. सकाळी 4 ते 6 काकडा, 7 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 4 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ राञी 8 ते 10 किर्तन असा सात दिवसा पासून कार्यक्रम चालू आहे…भागवत कथा निमित्य 12 फेब्रु.ला ह.भ.प.अमोलजी शास्ञी बोरगाव काहे लातूर यांचे किर्तन आहे तर 13 फेब्रु.ला भागवताचार्य महंत प्रभाकर बाबा कपाटे महाराज भोकर यांचे किर्तन आहे. अख्या गावाचे सहकार्य मिळत असून एकोपा व प्रेम वाढले आहे…!*