Home Breaking News प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न!

प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कार्यशाळा संपन्न!

👉 शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा.

👉 तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब यांचे आवाहन

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – १४ जानेवारी २०२३

हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी जनजागृती कार्यशाळा आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगर यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणुन त्रीसुत्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. १. प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत कार्यशाळा
२. आतंरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 आणि
३. श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्त अशा विविध विषयांवर प्रस्तावित करतांना जाधव साहेब यांनी
👉 ” तृणधान्य काळाची गरज”
या विषयावर मार्गदर्शन करतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ( युनो) मध्ये तृणधान्याचे महत्व जगाला पटवून दिले. आणि ते सर्व जगातील देशांनी ते मान्यही केले. कारण आपल्या आहारातील सतत गव्हाचे अन्न खाने हे मानवाच्या आरोग्यास धोकादायक आहे. म्हणून आपण ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई,राफा, राजगिरा , यांचे आहारात महत्व द्यावे. म्हणून सर्व जगभरातील देशांना मोदींनी पटवुन दिले. त्याच अनुषंगाने सन २०२३ हे वर्ष आतंरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून सतत दहा साजरे करण्याचे आदेश दिले. म्हणून सर्वांनी आपल्या आहारात तृणधान्याचा वापर वाढला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले.

👉 प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत विविध योजनेची माहिती जिल्हा संसाधन व्यक्ती समर्थ भोरगे यांनी एकुण विविध बाबींवर ३५% लाभार्थी सबसिडी दिली जाते. याविषयी शेतकरी गट, वैयक्तिक लाभार्थी सबसिडी आणि योजनेची माहिती सांगताना ते म्हणाले की, तुम्ही एखाद्या उद्योग करतांना तुमचे बॅकेत पण असणे अत्यंत गरजेचे आहे. तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.
यावेळी विविध मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनी, शेतकरी, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनव आभार प्रदर्शन मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर यांनी केले.

Previous articleथेट….❤️ ह्रदयातुन
Next articleपवना येथे अखंड हरिनाम सप्ताह.