विशेष……
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 14 जानेवारी 2023
” लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….दादा (अन्ना) _वहिनी …👑💐
माणुसकी जपणा-या परीवारातील एका आनंदी क्षणाची कहाणी……
नुकतेच ❤️ प्रत्यारोपण झालेले होते…. शस्त्रक्रिया पार पडलेल्या समाजाप्रती परोपकाराची भावना मनात ठेऊन, आज सहपरिवारचे अवयवदान संकल्प…….
👉 हि तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील इतरांना प्रेरणा देणारी आपुलकीच्या माणसांची कहाणी…..
बालाजी राजाराम बलपेलवाड ( झरेवाड) एक सभ्य, ईमानदार, प्रेमळ, उच्चशिक्षित व्यक्ती……
नुकतेच हृदयाच्या_शस्त्रक्रियामुळे पुनर्जन्म मिळालेले बंधूतुल्य बालाजी राजाराम बलपेलवाड यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी अवयव दानाचा संकल्प केल्याचे पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. डी. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व जसलोक हॉस्पीटल मुंबईचे डॉ. हेमंत पठारे, डॉ. उपेंद्र भालेराव व इतर डॉक्टर आणि ब्रदर सिराजभाई यांच्या प्रेरनेणे आज दिनांक 15/02/2023 रोजी अवयव दानाचे संकल्प केला. यावेळी स्वतः बालाजी राजाराम बलपेलवाड, पत्नी अंजना बालाजी बलपेलवाड, मुलगा अजिंक्य बालाजी बलपेलवाड, मोठी मुलगी अनुजा बालाजी बलपेलवाड व मुलगी अश्विनी बालाजी बलपेलवाड यांनी अवयव दानाचे संकल्प केला आहे. कुटुंबातील मुख्य व्यक्तीला चक्क ह्रदय बदलाव लागत आहे. आणि याच बदल्यात दुस-या व्यक्तीचे ह्रदय बदलुन मिळत असेल तर, त्यांच कुटुंबातील सर्व सदस्यांनी अवयव दान करण्याचे प्रतिज्ञा पत्र तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना द्यावे. यापैक्षा मोठी बातमी माझ्यासाठी दुसरी आजतरी कोणतीच नाही….
म्हणूनच आपुलकीची भावना ठेवून या जगात निस्वार्थीपणे जगणारी माणसं फार कमी आहेत. त्यातच प्रामुख्याने बालाजी बलपेलवाड ( झरेवाड) यांच्या कुटुंबीयांनी ठेवलेला एक उत्कृष्ठ आदर्श…..
यावेळी कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित रामभाऊ सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष, पत्रकार अनिल नाईक, डॉ.डी.डी गायकवाड डॉ .भुरके, डॉ. सदावर्ते , डॉ. बुरकुले, डॉ. कच्छवे, रमेश पाटील ,संतोष नारखेडे व इतर उपस्थित होते.
त्यांच्या या उपक्रमाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन…! प्रत्यारोपण झालेले होते…. शस्त्रक्रिया पार पडलेल्या समाजाप्रती परोपकाराची भावना मनात ठेऊन आज सहपरिवारचे अवयव दान संकल्प…….
बालाजी राजाराम बलपेलवाड ( झरेवाड) एक सभ्य, ईमानदार, प्रेमळ, उच्चशिक्षित व्यक्ती…..
त्यांच्या या उपक्रमाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन…!