(अजयसिंह राजपूत)युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे प्रथम राज्यस्तरीय अधिवेशन पर्ललाईन बीच रिसॉर्ट डहाणू, ता. डहाणू, जि. पालघर येथे दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाले या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष श्री इमरान पठाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करुन करण्यात आले व त्यानंतर संगठनच्या चर्चासत्राला व परिसंवादाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.अधिवेशनाच्या दुसऱ्या ‘दिवशी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मार्गदर्शनाकरीता, चर्चासत्राकरीता व पदाधिकारी व सदस्यांच्या सन्मान सोहळ्याकरीता प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला मा. श्री. सुनीलभाऊ भुसारा ( आमदार विक्रमगड), मा. श्रीमती मनीषाताई निमकर (माजी राज्यमंत्री), मा. श्री प्रवीणभाऊ गवळी (सभापती पं.स. डहाणू), मा. श्री भरतभाई राजपूत (नगराध्यक्ष डहाणू), मा. श्री काशिनाथजी चौधरी (जि.प.सदस्य व माजी बांधकाम सभापती), मा. श्री शैलेशभाऊ करमोडा (जि.प. सदस्य पालघर ), मा. श्री मुकने सर ( उपसरपंच कासा ग्रामपंचायत), मा. श्री विनोद सांगवीकर (वकील मुंबई उच्च न्यायालय) व मा. श्री कमलाकर शेनॉय सर (वरिष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते) इत्यादी मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
यावेळी संगठनचे सचिव श्री पुरुषोत्तम सदार व सदस्य श्री सुधीर लाडझरे यांनी अधिवेशनाचा उद्देश व संगठनचे कार्य व त्याकरीता अधिवेशनाची आवश्यकता आपल्या प्रास्ताविक मधून व्यक्त केली, यानंतर संगठनच्या सर्व पदाधिकारी व सभासदांचा स्वागत समारंभ घेण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात संगठनच्या माध्यमातून ग्रामविकासाची जनजागृती व चळवळ उभारून भ्रष्ट्राचाराविरुद्ध लढा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपत्र देऊन व जिल्हा संगठनला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.माहिती अधिकार कायद्याचा वापर, तक्रार किंवा निवेदनाचा शेवटपर्यंत पाठपुरावा, ग्रामपंचायतविषयी कायद्यांचा अभ्यास व संगठन वाढीसाठी उपाययोजना यासर्व विषयावर श्री डॉ सतीष बोढरे (धुळे जिल्हाध्यक्ष), श्री हारुन शाह (मुख्य कार्यकारीणी पदाधिकारी), श्री रोशन पुनवटकर ( नागपूर जिल्हाध्यक्ष) श्री राजेंद्र निकम (जळगाव जिल्हाध्यक्ष) व श्री सुनिल कदम (सातारा जिल्हाध्यक्ष) यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर अॅडव्होकेट मा. श्री विनोद सांगवीकर व मा. श्री कमलाकर शेनॉय सर यांनी सभासदांनी विचारलेल्या कायदेशीर अडचणी संबंधित प्रश्नांची उत्कृष्ट प्रकारे उत्तरे दिली व कायदेशीरपणे आपला ग्रामविकासाचा लढा कसा लढता येईल याबाबत योग्य मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक सभासदान आपले सगठन व कार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले.शेवटी अधिवेशनाच्या समारोपीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री इमरान पठाण (संस्थापक अध्यक्ष युवाशक्ती संगठन महाराष्ट्र राज्य) यांनी संगठनच्या माध्यमातून ग्रामपंचायत कारभाराची व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून ग्रामविकासाची चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कशी पोहचविता येईल याबाबत मार्गदर्शन केले व संगठनच्या माध्यमातून भ्रष्ट्राचाराविरुद्ध लढा उभारुन संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामविकास घडवून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांना प्रतिज्ञा दिली.
या दोन दिवसीय भव्य-दिव्य अधिवेशनाचे आयोजन पालघर जिल्हाध्यक्ष श्री समशेरभाऊ माणेशिया यांच्या मार्गदर्शनात युवाशक्ती ग्रामविकास संगठन पालघर जिल्ह्याने केलेले होते. या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, संपूर्ण अधिवेशनाच्या संचालनाची जबाबदारी श्री शेकडे सर यांनी पार पाडून अधिवेशनाची शोभा वाढविली.