Home Breaking News कोसमेट ते शिवणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!

कोसमेट ते शिवणी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे!

👉 संतोष अनगुलवार सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका उपाध्यक्ष पेरकेवाड समाज संघटना यांचा आरोप.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 14 जानेवारी 2023
किनवट तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेल्या इस्लापुर – कोसमेट ते शिवणी रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे चित्र नुकतेच सामाजिक कार्यकर्ते तथा तालुका उपाध्यक्ष पेरकेवाड समाज संघटना संतोष अनगुलवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.
या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे सुद्धा निकृष्ट दर्जाचे आहे. हे अतिशय चांगल्या दर्जाचे व्हावे, नाही तर आगामी काळात संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात या विभागातील सर्व शेतकरी, सामान्य मजुर सह मी स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहे. असेही अनगुलवार यांनी म्हटले आहे.
सामाजिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी या कामाच्या दर्जाबाबत वेळोवेळी लक्ष घालावे. असेही ते म्हणाले.

Previous articleकेंद्रीय कैबिनेट मंत्री पुरषोत्तम रूपाला यांच्याकडे मेंढपाळ बांधवांच्या समस्या सोडवीन्याबाबत मागणी
Next articleपरमेश्वर मंदिर कमान ते रेल्वेगेट रस्त्याची दयनीय अवस्था!