हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
आज नाशिक जिल्ह्यात केंद्रीय कॅबिनेट पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स संवर्धन मंत्री मा. श्री पुरुषोत्तम रूपाला यांचा दौरा होता. या दौऱ्यात पशूसंवर्धन व मेंढपाळ यांच्या विषयावर मीटिंग आयोजित केली होती. त्या प्रसंगी मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करून आम्ही धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने मागणी केली की, मेंढ्या व बकऱ्या मृत्वूचे प्रमाण हे हिंस्र श्र्वापदापेक्षा, रोड अपघातात व दूषित चारा, पाणी पिण्याने अधिक होते. त्यावर शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत ह्या मेंढपाळना मिळत नाही. त्यामुळे मेंढपाळ यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होतात. त्यामुळे ह्या घटना नैसर्गीक आपत्तीत बसवून त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक लाभ देण्यात यावा ही प्रमुख मागणी केली. व त्यांनीही ती मागणी मान्य करून नोट करून घेतली. त्यावर लवकरच अंमलबजावणी करू असे सांगितले. त्या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त मा. श्री बाबुराव नरवाडे, मा. विकास महात्मे, धनगर समाज सेवा संस्थेचे प्रदेशअध्यक्ष मा. नवनाथ ढगे, मा. आर. पी. कुवर, प्रहार जिल्हा
आज नाशिक जिल्ह्यात केंद्रीय कॅबिनेट पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स संवर्धन मंत्री मा. श्री पुरुषोत्तम रूपाला यांचा दौरा होता. या दौऱ्यात पशूसंवर्धन व मेंढपाळ यांच्या विषयावर मीटिंग आयोजित केली होती. त्या प्रसंगी मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करून आम्ही धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने मागणी केली की, मेंढ्या व बकऱ्या मृत्वूचे प्रमाण हे हिंस्र श्र्वापदापेक्षा, रोड अपघातात व दूषित चारा, पाणी पिण्याने अधिक होते. त्यावर शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत ह्या मेंढपाळना मिळत नाही. त्यामुळे मेंढपाळ यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. कुटुंब च्या कुटुंब उध्वस्त होतात. त्यामुळे ह्या घटना नैसर्गीक आपत्तीत बसवून त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक लाभ देण्यात यावा ही प्रमुख मागणी केली. व त्यांनीही ती मागणी मान्य करून नोट करून घेतली. त्यावर लवकरच अंमलबजावणी करू असे सांगितले. त्या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त मा. श्री बाबुराव नरवाडे, मा. विकास महात्मे, धनगर समाज सेवा संस्थेचे प्रदेशअध्यक्ष मा. नवनाथ ढगे, मा. आर. पी. कुवर,प्रहार जिल्हा चिटणीस समाधान बागल, नामदेव गोपाळ, ज्ञानेश्वर परदेशी, निंबा जाधव, बापू शिंदे, सुदाम लोंढे, नाना मोगरे, नितीन मोगरे, लक्ष्मण पुणेकर,दादाजी जाधव, संदीप सावळे, व अनेक पदाधिकारी उपस्थित होते