Home Breaking News घरकुल योजनेचा लाभ घेतलेले क्षेत्र संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) कमी करा

घरकुल योजनेचा लाभ घेतलेले क्षेत्र संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) कमी करा

ग्रामपंचायत नियमाप्रमाणे अधिकृत करा,पातुर तहसीलदारांना दिले निवेदन

अकोला — तालुका पातुर येथील गट क्रमांक चार मधील खाजगी( गुंठेवारी) जागेबाबत १.४८क्षेत्रापैकी अंदाजे ३५ प्लॉट सन २००० पासून दशरथ रावजी उजाडे मालकीचे शेतामध्ये त्यांनी व त्यांच्या मुलांनी मौजे हिंगणा वाडेगाव येथील त्यांच्या मालकीचे गट क्रमांक ४ १.४८ अंदाजे ३५ लोकांनी गुंठेवारी खरेदीनुसार राहण्यासाठी शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे संबंधित क्षेत्रफळांमधून (सातबारा) हे कमी करून ग्रामपंचायत नियमाप्रमाणे अधिकृत करण्यात यावे गट क्रमांक ३ मधील लेआउट झालेल्या रस्त्याबाबत केलेला असून या रस्त्याचा वाद झालेला आहे दिनांक १९.१.२०२३ रोजी पातुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गावात आले होते दिनांक २०.१.२०२३ला ग्रामपंचायत कार्यालयाने सायंकाळी दवंडी दिली जे सरकारी रस्ते आहेत ते चालू करा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल या विषयाची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन बौद्ध पंचमंडळ हिंगणा वाडेगाव यांनी दिले आहे

Previous articleग्रुप ग्रामपंचायत कार्यालय संभापूर येथे ग्रामसभा संपन्न..!
Next articleआ. डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांच्यावर प्राणघातक हल्ला….