डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस मुक्तीभूमी वाचनालयात अनोखे अभिवादन
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
येवला (प्रतिनिधी)
बाल वयापासून रमाबाईंच्या आयुष्यात दुःख,यातना,हल-अपेष्टा, उपासमार,आर्थिक अडचणी पुढे भीमराव आंबेडकरांच्या सोबतच्या सहजीवनात कमी झाल्या नाहीत किंबहुना त्या अधिक वाढतच गेल्या होत्या.कोळसा-शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला रामाईच्या असीम त्याग समर्पणातुनच बाबासाहेब राष्ट्रनिर्मान कार्यात स्वतःला समर्पित करू शकले असे उदगार येवला बस आगाराचे नियंत्रक विकास वाहुळ यांनी काढले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येथे अनोखे अभिवादन करण्यात आले.
जेष्ठ साहित्यीक विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या रमाई व योगीराज बागुल यांच्या प्रिय रामू ह्या ग्रंथाच्या निवडक प्रसंगाचे अभिवाचन राजरत्न वाहुळ,प्रीती पाठारे,पूजा झालटे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सरिता शिरूड ह्या होत्या.
प्रारंभी रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ सर यांनी प्रास्ताविक केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ वाघ,ऍड.स्मिता झालटे,रेखा साबळे,आशा आहेर,महेंद्र पगारे,ऍड.चंद्रकांत निकम,वैभव साबळे,संगीता वाहुळ इ.मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच
रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर आभार शरद शेजवळ यांनी मानले