Home Breaking News पहिल्या राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनात गोवा राज्यात कवयित्री शितल शेगोकार यांचा सन्मान...

पहिल्या राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनात गोवा राज्यात कवयित्री शितल शेगोकार यांचा सन्मान सोहळा…..

शेगाव प्रतिनिधी:-

अध्यक्ष कवी लेखक प्राध्यापक आनंद अहिरे पुष्परत्न साहित्य समूह आयोजित प्रवासी कवी संमेलन गोवा येथे संपन्न झाले एकूण तीन दिवसीय नाशिक ते गोवा प्रवासी कवी संमेलन नाशिक येथे सर्वप्रथम कुसुमाग्रज प्रतिष्ठान या स्थळाला भेट देऊन प्रवास सुरू झाला तसेच प्रवासात मध्ये प्रत्येक कवींनी आपापल्या कवितेचे सादरीकरण केले व दुसऱ्या दिवशी गोवा येथे पोहोचले असता तेथील प्रसिद्ध असलेले काही ठळक स्थळांना भेटी दिल्या तो क्षण अतिशय महत्त्वपूर्ण ठरला त्यानंतर ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी वास्को, मु र गाव येथे घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री माननीय विनायक खेडेकर प्रमुख पाहुणे चित्रा क्षीरसागर व कालिका बापट तसेच माननीय तुलसीदास देसाई असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते संमेलनात प्रत्येक कवीने आपापल्या कविता सादर केल्या त्याचबरोबर कवयित्री शीतल शेवकर यांनीही आपली माता रमाई ही कविता साजरी केली व त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संपूर्ण विदर्भातून शीतल शेगोकार यांना शुभेच्छा देत आहेत

Previous articleमौजे दाबदरी भोडणी तांडा येथील दारूचे विरोधात महिलेचा एल्गार…!
Next articleशेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला – विकास वाहुळ