Home Breaking News गोदा संवर्धन अभियान ” अंतर्गत व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेची नूतन मराठी...

गोदा संवर्धन अभियान ” अंतर्गत व्हि. एन. नाईक शिक्षण संस्थेची नूतन मराठी शाळा आज भरली गोदाकाठावर

म. न. पा. प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांची प्रमुख उपस्थिती

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

“आम्ही सर्व खुशीत
आमची शाळा गोदावरीच्या कुशीत”
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळा आज गोदा संवर्धन अभियाना अंतर्गत गोदाकाठावर भरली
नाशिक महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणारे गोदा संवर्धन अभियान अंतर्गत गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गोदावरी ची माहिती द्यावी म्हणून आज आम्ही आमची शाळा गोदावरी काठावर भरवली. या शाळेला पालक वर्ग ही उपस्थित होता. सर्वात अगोदर राष्ट्रगीताने सुरुवात झाली. गोदा प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी घोषवाक्यातून परिसर दुमदुमून टाकला. गोदा संवर्धन गीत हा 120 विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मी गोदावरी बोलते. विद्यार्थिनी रोशनी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गोदा स्वच्छता करण्यात आली. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.

मनपा प्रशासन अधिकारी सुनीता धनगर मॅडम याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, गोदावरी स्वच्छतेचा संस्कार लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबविण्यासाठी घेण्यात आलेला हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. गोदा संवर्धन अभियान अंतर्गत सर्व शाळांनी असे कार्यक्रम राबवावेत. याप्रसंगी गोदा स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. गोदा संवर्धन गीताचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. स्वलिखित घोषवाक्य यांच्या घोषणा देऊन परिसर दुमदुमून गेला.

Previous articleअबकी बार! किसान सरकार” चा नारा देत बि.आर. एस. जिल्ह्यांतील राजकारणत ऐंर्टी.
Next articleमौजे दाबदरी भोडणी तांडा येथील दारूचे विरोधात महिलेचा एल्गार…!