जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 06 जानेवारी 2023
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे दिनांक 5 रोजी झालेल्या शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित केले. ” अबकी बार! किसान सरकार” चा नारा देत प्रचंड जनसमुदायला संबोधित करताना ते म्हणाले आम्ही तेलंगणा राज्यात मोफत विज, शुद्ध पिण्याचे पाणी, खरीप, रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी पाच हजार रुपये देऊ शकतो. पण महाराष्ट्रातील सरकारला ते का? येत नाही. या कृषिप्रधान देशातील हा अन्नदाता शेतकरी सुखी झाला पाहिजे. या देशात किती सरकारने आली. किती प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार,आमदार आले आहेत. पण शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली नाही. या देशात ५०,००० हजार टिएमसी पडलेले पावसाचे वाहून जाणारे पाणी जर अडविले तर शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग होतो. तेच आम्ही तेलंगणा राज्यात केले आहे. या देशावर ५६ वर्ष काॅग्रेसने राज्य केले आहे. १७ वर्ष झाले भाजपने राज्य केले आहे. पण ते शेतकऱ्यांसाठी कुणीच काही करु शकले नाही. भारतात नैसर्गिक साधनसंपत्तीची काहीच कमी नाही. पण त्यांचा योग्य उपयोग हे सरकार घेत नाही. म्हणून या देशातील बळीराजा सुखी होत नाही. असे म्हणत त्यांनी काॅग्रेस, भाजप वर हल्लाबोल केला आहे.
उचला गुलाबी झेंडा तुम्ही व्हा खासदार, आमदार महाराष्ट्रात आणा आपले भारत राष्ट्र समितीचे सरकार मी वचन देतो येत्या दोन वर्षांत सर्व शेतक-यांना मोफत विज उपलब्ध करून देतो. असे भावनिक आवाहन शेवटी त्यांनी केले आहे.