शिक्षकभर्ती – Tait अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परिक्षेकरीता मागच्या (2017) च्या चाचणी परिक्षेमध्ये अन्याय कारक रितीने खुल्या वर्गात समावेश केलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती वरचा अन्याय दुर करण्या करीता केलेल्या लढयाला यश मिळून या वर्षाच्या (2023) च्या चाचणी परिक्षे करीता न्याय मिळून रा खीव वर्गात झाला समावेश
भूमीराजा न्यूज़ – मुख्य संपादक अनिल उमाळे
मो. नंबर – 9860733562
सन 2017 मध्ये शिक्षक भर्ती करीता पहिल्यादा झालेल्या Tait म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परिक्षेकरीता डी. एड. व बी. एड. झालेल्या भट क्या विमुक्त जाती जमाती च्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाने अन्यायकारक पदधतीने खुल्या वर्गात समावेश करुन त्यांचा एस. सी. व एस. टी. च्या उमेदवारां प्रमाणे सवलत असल्याचा अधिकार डावलून त्यांचा खुल्या वर्गात समावेश करुन पुर्ण फी आ कारुन अन्याय केला होता.
हेमंत शिंदे (अध्यक्ष – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ, नाशिक ) यांच्या नेतृत्वा खाली केलेल्या आंदोलनाला व नाशिक जिल्हाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण परिषद आयुक्त व अध्यक्ष, शिक्षणमंत्री, भटक्या विमुक्त खात्याचे मंत्री, व शेवटी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री सीएमओ ऑफिस यांच्याशी सातत्याने प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार करुन भटक्या विमुक्त जाती जमातीवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करुन न्याय देण्याची मागणी केली होती.
हेमंत शिंदे यांनी सातत्याने पाच वर्ष या विरुद्ध वर्तमानपत्रे, न्यूज़ पोर्टल, सोशल मीडियाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त जाती जमाती वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोड़ली होती. लोकमत सारख्या अग्रगण्य वर्तमानपत्राने पाच भागांची वृत्तमालिका प्रकाशी त करुन या अन्यायाची गंभीर दखल घेतली होती.
2017 चे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सीएम ओ ऑफिस ने या अन्यायाची दखल घेवून या संदर्भात शिक्षण खात्याशी पत्रव्यवहार करुन चैाक शी सुरु केली होती. परंतु नंतर सरकार बदलणे व करोना परिस्थिति यामुळे न्याय मिळण्याचा निर्णय रखडला गेला होता.
परंतु या वर्षी 2023 साली नव्या शिंदे – फडणवीस सरकारने 30,000 शिक्षकांची भर्ती करायला नोटिफिकेशन जारी करुन पवित्र पोर्टल च्या माध्यमातून टैट परीक्षा म्हणजेच “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी च्या माध्यमातून जागा भरायला सुरुवात केली आहे.
हेमंत शिंदे अध्यक्ष – महाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ यांनी एकहाती केलेल्या या संघर्षाला यश आले असून शासनाने भटक्या विमुक्त जाती जमातीचा राखीव प्रवर्गात समावेश करुन झालेल्या अन्याय दुर केला आहे.
या बद्दल त्यांचे भटक्या विमुक्त जाती जमाती समाजातील लोकांकडून अभिनंदन केले जात आहे.
या अन्यायाच्या विरोधात झालेल्या आंदोलन प्रसंगी जी. जी. चव्हाण, हेमंत शिंदे, कल्पनाताई पांडे, डी. के. गोसावी,प्रदीप बड़गे, रामचंद्र घुटू कडे,अमोल घुगे, रामेश्वर साबते, हिमाशु चव्हाण, धर्मराज काथवटे, भालचंद्र निरभवणे, सुरज काळे, कैलाश काळे, संगीता विचारे, संजीवणी कावळे, अरुण ओतारी, दत्तात्रय सांगळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्तानी सहभाग नोंदवीला होता.