Home Breaking News आमदार आकाशदादा फुंडकर यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करावा.

आमदार आकाशदादा फुंडकर यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करावा.

भाजप तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांचे आवाहन

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी भुमिराजा न्यूज नेटवर्क

खामगाव:-भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष तथा खामगांव मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आकाशदादा फुंडकर यांचा वाढदिवस ५ फेब्रुवारी रोजी आहे. तरी खामगांव तालुक्यातील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्य बंधु भगिनी, तसेच भाजप जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सर्व संस्थांचे प्रतिनिधी, संचालक, तालुक्यातील सर्व आघाड्या, सेल, प्रकोष्ठ शक्ति केंद्र प्रमुख सर्कल प्रमुख, बूथ अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, जेष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते, भाजपा प्रेमी यांनी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपआपल्या संस्थेमध्ये, मतदार संघात, परिसरात, गावात, जनकल्याणाकरिता समाजउपयोगी कार्यक्रम करावे. गोरगरीब, अंध-अपंग, वयोवृद्ध, महिला इत्यादी नागरिकांना साडी-चोळी, अन्न धान्य इत्यादी मदत करणे व तसेच ऑक्सीजन देणारे झाड़े वड, पिंपळ, कडू लिंब, औदुंबर, चिंच या झाडांचे वृक्षारोपण करणे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन, खाऊ चे वाटप करणे. प्राथमिक आरोग्य केन्द्रामध्येरुग्णांना फळ वाटप करणे असे उपक्रम राबविण्यात यावे, मोठ्या गावात चौकात, बस स्टॉपवर शुभेच्छा देणारे फलक होर्डिंग लाऊन पेपरला जाहिराती द्याव्या, गोरगरीब मुलांना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करुन त्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्यावे, मंदिरामधे दुग्ध अभिषेक, महाआरती, प्रसादाचे वाटप करावे व आपल्या लाडक्या नेत्याला उदंड निरोगी आयुष्य लाभो व समाजाची निरंतर सेवा करण्याचे परमेश्वर त्यांना बळ देवो अशी परमेश्वराजवळ प्राथर्ना करावी व आपल्या परीने किंवा आपल्याला पटतील असे समाज उपयोगी कार्यक्रम करावे असे आवाहन भाजप तालुका अध्यक्ष सुरेश गव्हाळ यांनी केले आहे. ५ फेब्रुवारीला भारतीय जनता युवा मोर्चा, भाजपा विद्यार्थी आघाडी खामगांव मतदार संघ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर सकाळी ९ वा. गजानन महाराज मंदिर माधव नगर जवळ खामगांव येथे होणार असुन त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी, तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन आपले अनमोल योगदान दयावे असेही आवाहन गव्हाळ यांनी केले आहे.

Previous articleनवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्या : अध्यापकभारती
Next articleमहाराष्ट्र भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष हेमंत शिंदे यांच्या संघर्षाला यश.