Home Breaking News हिंगणा उमरा येथे राबविण्यात आली ‘स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोग जनजागृती अभियान’ मोहिम..!!

हिंगणा उमरा येथे राबविण्यात आली ‘स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोग जनजागृती अभियान’ मोहिम..!!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

हिंगणा:-30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या काळात राबविण्यात येणाऱ्या अभियानात या आजारांबाबत जनजागृती केली. ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध’ असे या मोहिमेचे घोषवाक्य आहे. जिल्ह्यात जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
हिंगणा येथे प्रजासत्ताक दिनी कुष्ठरोग निवारणाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.
हिंगणा (उमरा) येथे राबविण्यात आले असता 30 जानेवारी 2023 ते 13 फेब्रुवारी पर्यंत चालु असलेल्या मोहिमेत सहभागी असलेले जिल्हा परीषद मराठी प्राथमिक शाळा येथील विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक श्री चौधरी सर यांनी मोलाचा प्रतिसाद देवून प्रा. आ. केन्द्र बोथाकाजी मार्फत राबवण्यात आलेला स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम विषयी घेण्यात आलेली शपथ व कुष्ठरोग व क्षयरोग या विषयी आशा आरोग्य कार्यकर्ती सौ रजनी विजयराव जुमळे यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना व गावकरी मंडळींना माहिती दिली.संशयीत असल्यास भितीचे कारण नाही. त्वरीत डॉक्टरांना भेटून पहिले. निदान नंतर उपचार ‘समाजामध्ये कोणी जर कुष्टरोगी असेल तर त्या व्यक्ती सोबत खाणे फिरणे अश्या व्यक्तीनां वेगळेपणा न वाटता कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आरोग्य केन्द्रात जाण्यासाठी प्रेरीत करावे.अशी माहिती आरोग्य विभागातील आशा आरोग्य कार्यकर्त्या रजनी जुमळे यांनी दिली.
क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून तो कोणालाही होऊ शकतो. क्षयरोग मुख्यत्वे फुफ्फुसांवर परिणाम करतो. दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला, बारीक ताप, वजन कमी होणे, भूक मंदावणे ही लक्षणे आढळल्यास तो क्षयरोग असू शकतो. वृद्ध कुपोषित, मधुमेह, किडनीचे विकार, कमी प्रतिकार शक्ती, दमा, धूम्रपान, मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना खोकला येत असल्यास दोन थुंकी नमुने तपासणी करावी.

Previous articleस्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील आत्मदहनाचा प्रयत्न
Next articleनवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्या : अध्यापकभारती