Home Breaking News कोल्हापूर येथील बर्गमन ( हाफ आयर्नमेन)स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पत्रकार म्हणून रमेश चव्हाण...

कोल्हापूर येथील बर्गमन ( हाफ आयर्नमेन)स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम पत्रकार म्हणून रमेश चव्हाण यांनी विक्रम नोंदवला ..

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी

जगभरात अतिशय कठीण समजली जाणारी आयर्न मेन स्पर्धा ही आता खेळाडू, अधिकारी यांच्यासह लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवाना सुद्धा भुरळ पाडत आहे. २९ जानेवारी रोजी कोल्हापूर येथे पार पडलेल्या ह्या स्पर्धेत पत्रकार सुद्धा मागे नाहीत ही बाब दै. खोजमास्टर चे संपादक रमेश चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिली.
याबाबत सविस्तर असे की, बर्गमन ही स्पर्धा म्हणजे हाफ आयर्न मेन समान असते या स्पर्धेत जर्मनी, फ्रांस,मलेशिया तसेच संपूर्ण देशभरातील विविध १२०० लोकांनी सहभाग नोंदवला. १.९ किमी स्विमींग, ९० किमी सायकलिंग, २१किमी रनींग हा सर्व पल्ला ८:३० तासात पूर्ण करणे गरजेचे आहे .एलीट गटातील स्पर्धकांना हा नियम लागू होतो.सर्वसाधारण गटाकरीता ही वेळ ९ तासांची असते. महत्वाचे म्हणजे एलीट गटाला प्रत्येक स्पर्धा ही वेळेतच पूर्ण करावी लागते जसे की ,१.९ किमी स्विमींग १:१० मि , ९० किमी सायकलिंग ४:२० मि, २१ किमी रनिंग ३ तासात कंप्लीट करने अनिवार्य आहे .विशेष म्हणजे कोणत्याही एका स्पर्धेत जर वेळेपूर्वी नाही पूर्ण करता आली तर पुढील स्पर्धेत सहभागी करण्यात येत नाही. त्याच ठिकाणी त्या स्पर्धकाला बाद करण्यात येते. अशी ही शारिरीक, मानसिक दृष्टीने अतिशय कठीण समजली जाणारी स्पर्धा ही पत्रकार रमेश चव्हाण यांनी ७ तासांपूर्वी पूर्ण करून पत्रकार बांधव सुद्धा कशातच मागे नाहीत हे सिध्द केले. ही स्पर्धा पूर्ण करताना १.९ किमी.स्विमींग ५९ मिनीटात,९०किमी सायकलिंग ४ तास ०६ मिनिट, तर २१ किमी रनिंग ही १ तास ५५ मिनिट या कालावधी मध्ये एकूण ७ तासांपूर्वी पूर्ण केली. साधारण
९ तासांची मर्यादा असते,त्यात कोणत्याही स्पसर्धेला डेडलाईन नसते .या ९ तासात ही स्पर्धा पूर्ण करायची असते.
अशा आव्हानात्मक स्पर्धेत केवळ सहभागी न होता वेळेत ही स्पर्धा पूर्ण करून पत्रकार रमेश चव्हाण यांनी बुलडाणा जिल्हाच नव्हे तर देशभरातील पत्रकार बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या ह्या अलौकिक कामगिरी मुळे देशभरातील पत्रकार बांधवांकडून तसेच विविध स्तरावरील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. .

Previous articleहरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव.
Next articleस्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील आत्मदहनाचा प्रयत्न