👉 कृषि वार्तापत्र
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 29 जानेवारी 2023
यावर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडला असल्याने, रब्बी हंगामातील गहु, ज्वारी, हरभरा पिकांची पेरणीचे क्षेत्र वाढ वाढले आहे. परीणामी एकाच जमीनीवर वारंवार दरवर्षी त्याच पिकांचे उत्पादन घेणे आणि जास्तीत जास्त पाऊस पडल्याने जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी शेतकऱ्यांना पिकाची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करून, सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. परंतु तसे होतांना दिसत नाही. त्या मागील अनेक कारणे असू शकतात.
परंतु आज रोजी शेतीकडे फेरफटका मारताना हरभरा पिकांवर मर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळिराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र दिसत आहे.
👉 विहिरीत पाणी आहे. पण विज नाही.
” बाप जेऊ घालना ! माय भिक मागु देईना ” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस जास्त पडल्याने विहीर, कुपनलिका, नाले, ओढे, छोटे, मोठे तलाव, नदी यांना प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा दिसुन येते आहे. परंतु महावितरण कंपनीने यावर्षी आठ तास विज न देता. चार ते पाचच तास विजेचा कंपनी पुरवठा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विहिरीत पाणी असुन विद्युत पंप चालू होत नाहीत. कारण विजेचा पुरवठा सुरळीत होत नाही. याबाबीची दखल कुठल्याच खासदार, आमदार किंवा इतर लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. एकंदरीत बिले वसुली करुन, शेतक-यांना वेठीस धरण्याचा गोड प्रयत्न महावितरणचा आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.