अनिल उमाळे – मुख्य संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर -9860733562
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाहीचा चैाथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील गुणीजनांचा पत्रकार कार्य गैारव पुरस्कार सोहळा 2023 व देशभक्ती व सुमधुर गीतांची मैफल चे आयोजन सक्षम ग्राहक जागरूकता मंच व देवयानी ऐड व्हीजन यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता क्रांतिवीर व्ही. एन. नाईक संस्थेच्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे इंजीनियरींग महाविद्यालय सभागृह, कँनडा कॉर्नर नाशिक येथे करण्यात आले होते.
हेमंत शिंदे ( नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ तथा पिवळ वादळ मासिक – सह संपादक ) यांना पत्रकारिता क्षेत्रातील कार्या करिता पत्रकार कार्य गैारव पुरस्कार देवुन डॉ. शशिताई अहिरे ( चेअरमन – दि. नाशिक महिला सहकारी बैंक तथा महिला प्रदेशाध्यक्ष – सहकार भारती ), डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी ( संचालक – श्री. साईबाबा हार्ट इंस्टीटयूट अण्ड रिसर्च सेंटर – नाशिक )प्रा. सुनिल रुणवाल (संचालक सागर क्लासेस, नाशिक ), डॉ. निवेदिता खोत ( योगविद्या प्रचारक, संजीव नी होमियोपथी ), डॉ. आशालता देवळीकर ( व्याख्याता, लेखिका, कवियत्री, संचालक – स्पंदन हेल्थ केअर ), श्री. राजेश आंधळे ( अध्यक्ष – ग्राहक जागरूकता मंच ) व ज्योती सोनवणे ( संचालिका – देवयाणी ऐड व्हीज न ) यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
हेमंत शिंदे हे अनेक वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील समास्यां बाबत सातत्याने आवाज उठवित आहे.
या अगोदर त्यांना रोटरी इंटर नेशनल ऑर्गनायझेशन चा ” व्होकेशनल सर्विस अवार्ड “, गोदा रत्न पुरस्कार, महात्मा फुले विशेष पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पत्रकार कार्य गैारव पुरस्कार मिळाल्या बद्दल अनेक संस्था, संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.