Home Breaking News प्रजासत्ताक दिनी संपन्न होणार सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळा २०२३

प्रजासत्ताक दिनी संपन्न होणार सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळा २०२३

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

प्रजासत्ताक दिनी संपन्न होणार सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळा २०२३

नागरिक – ग्राहक हक्क व संरक्षण कायद्याच्या जनजागृतीसाठी निस्वार्थ, नि:शुल्क व निरंतर कार्यरत असणाऱ्या शासन नोंदणीकृत नेक्स्टजन फाऊंडेशन संचलित सक्षम ग्राहक जागरूकता मंच व सर्व प्रकारच्या जाहिरात व इव्हेंटस क्षेत्रातील सुप्रसिद्ध, अग्रगण्य असलेल्या देवयानी ॲड व्हिजन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या “प्रजासत्ताक दिन” निमत्त “सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळा २०२३” सोबत सुमधुर देशभक्ती गीतांची मैफल असा अभिनव कार्यक्रम दि. २६ जानेवारी २०२३ रोजी दु. २.३० वाजता, क्रांतिवीर वसंतराव नाईक इंजि. कॉलेज सभागृह, डोंगरे वस्तीगृह, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून साईबाबा हार्ट इंस्टीट्यूटचे संचालक प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, दि नाशिक जिल्हा महिला बँकेच्या चेअरमन डॉ. शशिताई अहिरे, क्रां. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस मा. हेमंत धात्रक, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, दिव्यांगसेवक मा. दत्तू बोडके, सागर क्लासेसचे संचालक मा. सुनील रूनवाल, संजीवनी होमिओपॅथी क्लिनिकच्या संचालिका योगविद्या तज्ञ डॉ. निवेदिता खोत, स्पंदन हेलथकेअरच्या संचालिका व व्याख्यात्या लेखिका डॉ. आशालता देवळीकर, व्हीजन अकॅडमीच्या संचालिका रूपाली आवारे, पुष्परत्न साहित्य समूहाचे प्रा. डॉ. आनंद अहिरे व सर्व सदस्य, नाशिक एनजीओ समूहाचे सदस्य व सर्व दैनिक, ईलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे संपादक, पत्रकार, प्रतिनिधी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

प्रजासत्ताक दिनी संपन्न होणाऱ्या सक्षम पत्रकार कार्य गौरव सोहळ्या सोबत सुमधुर देशभक्ती गीतांची मैफल असा अभिनव कार्यक्रमही होणार आहे. सर्व निमंत्रितानी सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे स्नेहपूर्वक आवाहन सक्षम ग्राहक जागरूकता मंचाचे अध्यक्ष राजेश आंधळे व देवयानी अॅड व्हीजनच्या संचालिका ज्योती सोनवणे यांनी केले आहे.

Previous articleकाटेवाले यांच्या बोगस पॅथॉलॉजीची लॅब चौकशी करा;
Next articleअनुसया मॅटर्निटी सर्जिकल अँड नर्सिंग होमचा उपक्रम