Home Breaking News महिला/ मुलीच्या सुरक्षेसाठी हिमायतनगर पोलीसांची विशेष मोहीम.

महिला/ मुलीच्या सुरक्षेसाठी हिमायतनगर पोलीसांची विशेष मोहीम.

👉 पोलीसांकडुन जाहिर आवाहन.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 21 जानेवारी 2023

हिमायतनगर शहरात महिला/मुलीच्या सुरक्षेसाठी हिमायतनगर येथील पोलीसांनी विशेष मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. शहरातील शाळां, काॅलेजात शिक्षण घेणा-या मुली व सार्वजनिक ठिकाणी महिला यांची सुरक्षा व्हावी. याच उद्देशाने हि मोहीम राबविली जाणार आहे. समाजातील काही टवाळखोर मुलं शाळेत, काॅलेज मध्ये जात असतांना या टवाळखोराकडुन त्रास होत असेल तर, आपल्या आईवडिलांना किंवा हिमायतनगर पोलिस प्रशासनाला त्वरित कळवावे. त्यासाठी आम्ही 24 तास आपल्या सेवेत हजर आहोत. त्रास देणा-या व्यक्ती किंवा मुलाची द्यावी. आम्ही माहीतीची गोपनीयता लक्षात घेऊन, त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडत असेल, तर 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन हिमायतनगर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक बि. डी. भुसणुर , सहायक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, सहायक पोलिस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी केले आहे.

Previous articleगडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा
Next articleभाजपाच्या प्रदेश मीडिया पदाधिकाऱ्यांची नियुक्ती