Home Breaking News बाळापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

बाळापूर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी 7709759836

बाळापूर – स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व
विज्ञान महाविद्यालय येथे मा. प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर यांच्या मार्गदर्शना मध्ये रा. से. यो. पथकाच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी IQAC CO – ORDINATOR डॉ. सुनिल उन्हाळे सर होते तर प्रमुख वक्ते प्रा. प्रवीण तायडेएल. एन. कला महाविद्यालय वाडेगाव होते. प्रा. प्रवीण तायडे यांनी आपल्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.सुनिल उन्हाळेयांनी आजच्या युवा पिढीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले जीवन आदर्श करण्याबाबतीत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक रा. से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम बाठे यांनी केले तर आभार महिला रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.जयश्री भिसे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा.शरद कुलट, डॉ. प्रकाश वानखडे व रा. से. यो.स्वयंसेवक उपस्थित होते.

Previous articleशेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन
Next articleग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू..!