Home Breaking News सराफा व्यापारी मिलींद जन्नावार यांचे अल्पशा आजाराने निधन.

सराफा व्यापारी मिलींद जन्नावार यांचे अल्पशा आजाराने निधन.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 14 जानेवारी 2023

हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय, शांत, अत्यंत संयमी व्यक्तीमत्व असलेले शहरातील जन्नावार ज्वेलर्सचे मालक मिलींद शेठ सुदर्शन जन्नावार यांचे अल्पशा आजाराने हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान दिनांक 14 रोजी चार वाजेच्या दरम्यान निधन झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानकपणे बिघडयामुळे त्यांना हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या टिमने अथक प्रयत्न करूनही, अखेर आज रोजी दिनांक 14 शनिवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळे संबंध हिमायतनगर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात असुन, सर्वत्र शोककळा पसरली आहे. हि घटना शहरात समजताच सराफा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. उद्या दिनांक – 15 रोजी वैकुंठधाम स्मशानभूमी येथे (पाण्याची टाकी जवळ) सकाळी ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जन्नावार ज्वेलर्स नांवाने त्यांची सर्वदुर ओळख निर्माण झाली होती. ते एक विश्वासु सोन्याचांदीचे व्यापारी म्हणुन परीचीत होते.
भुमीराजा न्युज परीवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

Previous articleभारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केद्रांचा मनमानी कारभार!
Next articleशेतकऱ्याची कन्या कवयित्री पूजा सांगळे लिखित ‘आयुष्य आव्हान आणि संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन