👉 झिरो खाते काढण्यासाठी ग्राहकांना द्यावे लागतात पैसे.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 14 जानेवारी 2023
हिमायतनगर शहरात सध्या एकच भारतीय स्टेट बँकेची एक शाखा अस्तित्वात आहे. बॅकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचे काम वाखाणण्याजोगी आहे. परंतु भारतीय स्टेट बँकेच्या अंतर्गत शहरात ग्राहक सेवा केंद्र ( CSC) सेंटर ग्राहकांना बॅकेची सेवा उपलब्ध करुन देतात. त्यात ग्राहकांचे पैसे काढणे, पैसे भरणे, सेव्हींग खाते, ० ते १० वर्षांपर्यंत मुला, मुलींचे खाते उघडणे इत्यादी कामे करत असतात. शिष्यवृत्ती पात्र शालेय विद्यार्थ्यांचे शुन्य खाते काढण्यासाठी काही ग्राहक सेवा केंद्र चालक यांनी चक्क २५० रुपये घेऊन, ग्राहकांची आर्थिक लुट करत आहेत. असे निदर्शनास आले आहे. त्यात काही ग्राहकांच्या आशाही तक्रारी आहेत. CSC सेंटर कडुन पैसे काढण्यासाठी अतिरिक्त पैसे हजार रुपयाला दहा रुपये द्यावे लागतात. वरील सेवा ग्राहकांना विनामूल्य देण्यात याव्यात. डिजीटल इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारने या ग्राहक सेवा केंद्राची निर्मिती केली आहे. यासाठी बॅक त्यांना सहकार्य करते. तरीही हि लुट काही केल्या थांबत नाहीत. भारतीय स्टेट बँकेच्या वरीष्ठ अधिका-यांनी या ग्राहक सेवा केंद्र चालक यांना सक्तीच्या सुचना देऊन हि ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. अशी मागणी ग्राहकाकडुन होत आहे.