Home Breaking News जिल्ह्यात रब्बी पिक पेरा नोंदणीसाठी प्रत्येक गावात विशेष मोहिम

जिल्ह्यात रब्बी पिक पेरा नोंदणीसाठी प्रत्येक गावात विशेष मोहिम

👉 जिल्हाधिकारी नांदेड

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 14 जानेवारी 2023

जिल्ह्यातील सर्व खातेदारांना /शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनची माहिती व जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या शेतातील पीकांची माहिती गाव नमुना नं. सातबारावर नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन आज रोजी करण्यात आले आहे. ही मोहिम शनिवार 14 जानेवारी रोजी मोहिम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून, आपली पीकपेरा नोंदणी पूर्ण करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ई-पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव न. नं.12 मध्ये नोंदविण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील तलाठी/कृषी सहाय्यक/पोलीस पाटील/रोजगारसेवक/रेशन दुकानदार/शेतीमित्र/कोतवाल/प्रगतीशील शेतकरी/आपले सरकार सेवा केंद्रचालक/सीएससी केंद्रचालक/संग्राम केंद्रचालक/कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी/तरुण मंडळाचे पदाधिकारी असे प्रत्येक गावासाठी किमान 20 स्वयंसेवक निश्चित केले आहेत. यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याची कार्यवाही करावी असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleअंतरराष्ट्रीय तृणधान्य धान्य दिन साजरा!
Next articleभारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केद्रांचा मनमानी कारभार!