Home Breaking News मा आयुक्त सो यांना एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल तात्काळ थांबविणे बाबत...

मा आयुक्त सो यांना एकलव्य शाळेतील विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल तात्काळ थांबविणे बाबत मनविसेचे निवेदन.

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक : शुक्रवार दिनांक ०६ जानेवारी रोजी आदिवासी विकास विभाग संचालित एकलव्य निवासी शाळेतील मुलांच्या जेवणात अळ्या निघाल्यामुळे विद्यार्थ्यांना अन्नत्याग आंदोलन करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडून ०४ थी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांचे जेवणाचे सुरु असलेले हाल समोर आले. आश्रमशाळांमध्ये राहून विद्यार्जन करणाऱ्या दुर्गम ते अतिदुर्गम भागातील गोरगरीब परिवारातील जवळपास दोन लाख विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी प्रशासनाची आहे. निकृष्ठ दर्जाच्या जेवणाच्या तक्रारी वरून स्थानिक ठेकेदाराचा ठेका काढून सेन्ट्रल किचनच्या माध्यमातून जेवण सुरु करण्यात आले. मात्र आता परत मुलांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आदिवासी विकास विभागाचा एकुणच भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून फक्त कागदोपत्री सोयी सुविधांचे सोपस्कार पूर्ण करून गरीब आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ सुरु आहे. सेन्ट्रल किचनच्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून व त्याचा ठेका तात्काळ रद्द करावा व आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरळीत अन्नपुरवठा होण्यासाठी जातीने लक्ष देऊन गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा या विरोधात प्रखर जन-आंदोलन उभारण्यात येईल असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मा. अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांना देण्यात आले. यावेळी मा. आदिवासी अपर आयुक्तांनी मनविसेच्या शिष्टमंडळास या बाबत चौकशी करून तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, शशिकांत चौधरी, बाजीराव मते, मनविसे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, कौशल (बब्बु) पाटील, मनोज गोवर्धने व महेश लासुरे, शहराध्यक्ष संदेश जगताप, शहर संघटक ललित वाघ,जिल्हा सचिव शुभम थोरात, त्र्यंबक तालुकाध्यक्ष अनिल चोथे, त्र्यंबक शहराध्यक्ष अजिंक्य देवरे, अक्षय कोंबडे, अमोल भालेराव, मेघराज नवले,धनराज रणदिवे, अजिंक्य संजय देवरे,शेहबाज काझी, निल रौंदळ, गणेश शेजुळ,विशाल बोराडे, शुभम आढाव, ऋषिकेश झोटिंग,मयूर पाटील, अभिजित राऊत, शुभम महाले, मेघराज साळवे, कृष्णा मुर्तडक आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Previous articleपाचशिव महादेव ( पार्श्वनाथ) यात्रेतील कुस्तीस्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न.
Next articleपुष्परत्न साहित्य समूह बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी शितल शेगोकार यांची निवड