👉 बोरगडीचे रामदास शेनेवाड ठरले पहिल्या बक्षिसांचे मानकरी.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 06 जानेवारी 2023
हिमायतनगर तालुक्यातील महादेव फाटा (पार्श्वनाथ) येथील यात्रेला दिनांक २ जानेवारी २०२३ रोज सोमवारी महादेवाचा महाअभिषेक करुन, महाप्रसादाने सुरुवात झाली होती. सिध्दीविनायक संगीत भजनी मंडळ एकघरी भजनी मंडळांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लेझीम स्पर्धा, संगित भजनी स्पर्धा, हाॅलीबाॅल स्पर्धा, शालेय खो- खो स्पर्धा, (मुलं, मुली), कब्बडी स्पर्धा, शंकरपट स्पर्धा, आणि आज सहा जानेवारी भव्य कुस्त्ती स्पर्धा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या आहेत. या कुस्ती स्पर्धेत तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांतील पहेलवान आले होते. कुस्तीचे पहिले बक्षीस श्रीक्षेत्र बोरगडी येथील रामदास शैनेवाड याने पटकाविले आहे. दुसरे बक्षीस माजी कुस्तीपटू रमेश शेनेवाड यांचे चिरंजीव याने पटकाविले आहे.
👉 अपंग पहेलवानाने कुस्ती जिंकली….
या कुस्ती स्पर्धेत एक हात नसलेला पहेलवानाने प्रतिस्पर्धी पहेलवानाला चित केले आहे.
यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष कामणराव वानखेडे, सत्यवृत ढोले, गणेशराव भुसाळे, प्रकाशदादा जाधव, नागोराव बुरकुले, वामनराव जाधव, गंगाधर मित्राने पाटील, सरपंच सुनील शिरडे, माजी सरपंच सिद्धार्थ राऊत, दिलीपराव अनगुलवार, गुणाजी आडे, कैलास अनगुलवार, गोविंद काळे, परीसरातील संरपंच, चेअरमन, पत्रकार, बंदोबस्तासाठी हिमायतनगरचे पोलीस उपनिरीक्षक महाजन साहेब, राठोड साहेब, त्यांचे सहकारी उपस्थित होते. सर्व प्रेक्षकांनी शांततेचे सहकार्य केले असुन, या यात्रेत कबड्डी, कुस्ती स्पर्धेचे समालोचन पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर आणि आनंदराव मोरे वाशीकर, बोरकर आदीनी केले आहे.