👉 धुक्यातुन वाट शोधवी लागते.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 06 जानेवारी 2023
सध्या उत्तर भारतात शितलहरीची लाट आल्याने, याच शितलहरीमुळे सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. प्रशासनाने तसा आदेश देऊन नागरीकांना सुचना दिल्या आहेत. अंगाला ऊब मिळावी म्हणून जागोजागी लोक शेकोटया टेकवुन थंडीपासून बचाव करत आहेत. तापमानात घट दिसून येत आहे. गहु, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या पिकांना ही कडाक्याची थंडी चांगली आहे. असे जाणकार शेतकरी आवर्जून सांगत आहेत. नागरीकांनी स्वेटर, मौफरेल, कानपटी अंगावर घेऊन या थंडीपासून बचाव करत असल्याचे चित्र दिसत आहे. एकंदरीत या हिवाळ्यातील हि कडक थंडी असुन, आता कुठेतरी हिवाळा जाणवत आहे.
रस्त्याने जाताना सर्वत्र धुक्याची चादर पसरली दिसत आहे. या धुक्यातुन वाहनधारकांना वाट शोधतांना कसरत करावी लागते आहे. हे मात्र निश्चित तेवढेच खरे आहे.