Home Breaking News सिल्लोड येथील कृषी महोत्सवातसाठी शेतकरी रवाना!

सिल्लोड येथील कृषी महोत्सवातसाठी शेतकरी रवाना!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – ०५ डिसेंबर २०२३

सिलोड जिल्हा औरंगाबाद येथील राज्यस्तरीय महोत्सवास हिमायतनगर तालुक्यातील चाळीस शेतकरी रवाना झाले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांना नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून, जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, याच उद्देशाने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी सन २०२३ या दरम्यान आयोजित, कृषि उत्पन्न बाजार समिती सिलोड आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रतापसिंह चौक परीसर सिलोड जिल्हा औरंगाबाद येथे संशोधन, प्रात्यक्षिक, परिसंवाद, तंत्रज्ञान आणि प्रगतशिल शेतकऱ्यांची यशोगाथा यावर विविध कृषि विद्यापीठाचा सहभाग राहणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ मुंबई ई. चा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे ६०० पैक्षा जास्त स्टाॅलची उभारणी करण्यात येणार आहे. ९९ विविध प्रात्यक्षिके दाखवली दाखविण्यात येतील. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शेती क्षेत्रातील यशस्वी शेतक-यांची यशोगाथा ऐकायला मिळणार आहे. या प्रदर्शनात ३२ विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्ष २३ चे राज्यस्तरीय उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होईल.
या शेतकरी सहलीसाठी तालुका कृषी कार्यालयकडुन कृ.प. काळे, कृ. प. आडे, कृ स. वानखेडे, कृ.स. नंदनवनात, आदी. कर्मचारी शेतकऱ्यांसोबत गेले आहेत.

Previous articleजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती धारक पात्र!
Next articleपार्श्वनाथ मंदिर यात्रा महोत्सवात जलधारा संघाला प्रथम बक्षीस.