Home Breaking News जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता...

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती धारक पात्र!

👉 हिमायतनगर तालुक्यात शाळा दुसरा क्रमांकवर!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 जानेवारी 2023

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत, सवना ज. जिल्हा परिषद शाळेचे १) कु. निशा मारोती अक्कलवाड
१) संकेत भारत गटकपवाड
३) अनिकेत केशव बुद्धेवाड
४) वरद संजय माने
वरील चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आज आलेल्या राजकीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती धारक पात्र झाले आहेत. यांच्या निवडीबाबत संरपंच, चेअरमन परमेश्वर गोपतवाड, मुख्याध्यापक बोडावार मॅडम, मुधोळकर सर, बोबडे सर, सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनबा अनगुलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास अनगुलवार, उपसरपंच प्रतिनिधी सोनबाजी राऊत, जिल्हा सचिव दिलीपराव अनगुलवार, राजेश्वर अनगुलवार, मा. पोलिस पाटील गणपत गोपेवाड पाटील सर्व ग्रा. पं. सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, शालेय समितीचे सदस्य, आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleभारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा ; निवेदन सादर
Next articleसिल्लोड येथील कृषी महोत्सवातसाठी शेतकरी रवाना!