Home Breaking News भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा ; निवेदन सादर

भारतातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा ; निवेदन सादर

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

येवला (प्रतिनिधी)
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिली मुलींची शाळा (भिडेवाडा,पुणे) हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे व सर्व शाळा महाविद्यालयात शाळाबाह्य मुलींच्या शाळा प्रवेशासाठी विशेष मोहीम राबून शाळेतील मुलींनी माता सावित्री प्रमाणे “कपाळी आडवी चिरी” (कुंकू) लावून बालिका शिक्षण दिन साजरा असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी,पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्थाचे संस्थापक शरद शेजवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले,फातिमा शेख यांनी सुरू केलेल्या भारतातील पहिली मुलींची शाळा (भिडेवाडा,पुणे) हे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे करून,राज्य सह देशातील सर्व शाळा महाविद्यालयात शाळाबाह्य मुलींच्या शाळा प्रवेशासाठी दिनांक ३ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३(सावित्रीबाई फुले ते राजमाता जिजाऊ जयंती) ह्या कालावधी विशेष मोहीम राबवावी असे आवाहन निवेदनात करण्यात आले असून शाळेतील मुलींनी माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रमाणे “कपाळी आडवी चिरी” (कुंकू) लावून बालिका शिक्षण दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी अध्यापकभारतीच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर वनिता सरोदे-पगारे,भारती बागुल,शैलेंद्र वाघ,सुभाष वाघेरे,प्रा.विनोद पानसरे,प्रा.कामिनी केवट,नितीन केवटे,महेंद्र गायकवाड, राजरत्न वाहूळ आदींच्या सह्या आहेत.

शरद शेजवळ
संस्थापक
अध्यापकभारती
(राष्ट्रीय बालक-विद्यार्थी,पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था)
फोन नंबर ९८२२६४५७०६

Previous articleकै. ग. भा. ठकुबाई पंढरीनाथ ताबडे याच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्ताने श्रीमद भगवतगीता,हनुमान चालीसा,व शिवलिला अर्मुत चे वाटप.
Next articleजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. चे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती धारक पात्र!