जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 1 जानेवारी 2023
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय आयोजित करण्यात आलेल्या, जिल्हा मासीक चर्चा सत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम हिमायतनगर तालुक्यातील काडंली बु., करंजी, हिमायतनगर, मंगरुळ, घारापुर आदी गावातील शेतावर घेण्यात आला आहे. काडंली बु. येथे भगत बोरकर यांच्या शेतातील पेरु लागवड व देशी जातीच्या पोल्ट्री फार्म हाऊसवर भेट देण्यात आली. त्यानंतर करंजी येथे संजुभाऊ चाभरेकर यांच्या शेतातील सामुहिक शेततळे आणि भाजीपाला रोपवाटीका मध्ये टोमॅटो उत्पादन येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ , कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हिमायतनगर येथील ” विकेल ते पिकेल” या योजने अंतर्गत S D अॅग्रीक्राॅस सेंटरला भेट दिली. यानंतर नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत मंगरुळ फळबाग लागवड मध्ये आंबा, पेरु, लिंबु आणि शेडनेट मधील मिरची लागवड यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच हिमायतनगर येथील शेतकरी गजानन तुपतेवार यांची डॅ्गनफुड व राजमा लागवडची पाहणी करण्यात आली. त्यानंतर शेवटी ढगे यांच्या शेतातील कुक्कुटपालन प्रकल्प , अवजारे बॅक आणि kds 992 ( फुले दुर्वा ) या सोयाबीन पिकाची पाहणी केली.
👉 संयुक्त कुटुंब पद्धतीतुन समृद्ध शेती करत ढगे परीवारांची आगेकुच
👉 व.ना.कृ.वि.चे शास्त्रज्ञ डॉ. गुट्टे सर यांचे प्रतिपादन.
ढगे यांच्या शेतातील शेतकरी उत्पादक कंपनीची पाहणी करून, आपल्या मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ गुट्टे सरांनी अनमोल विचार मांडले. ते म्हणाले ढगे परीवाराने संयुक्त कुंटुब पध्दतीने शेती करत आपली शेती समृद्ध शेती करत, एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. आजकाल संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या परीवाराने शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करुन ईतर शेतकऱ्यांपुढे चांगला आदर्श शेती चा नमुना विकसित केला आहे. अतिशय स्वादिष्ट भोजन देऊन प्रत्येक पदार्थात एक वेगळे प्रेम, आपुलकी मला वाटते आहे. असेही ते म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिमायतनगरच्या वतीने ढगे परीवाराचा सत्कार करण्यात आला. ढगे परीवाराकडुन पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब यांनी मानले.