Home Breaking News अलविदा…… 2022 !

अलविदा…… 2022 !

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 31 डिसेंबर 2022

आज 31 डिसेंबर या वर्षातील शेवटचा दिवस, सहजच बघितले तर सुर्य मावळतीला जाताना दिसत होता. जुन्या आठवणींनी भरलेले हे वर्ष सुखाच्या ओघात कधी संपत गेले. कळालेच नाही. कधी सुख तर कधी दुःखांनी भरलेले परंतु दुःखाची जाणीव न होऊ देता धैर्याने, सहनशीलता, संयम, साहस, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ममता, आदी गोष्टी शिकवुन जात असलेल्या या वर्षाला निरोप देत असतांनाच, वर्षभरातीला आठवणींना सहजच उजाळा मिळतो आहे. उद्या नविन म्हणजेच 2023 या वर्षाची पहिली सकाळ उजाडेल, तेंव्हा नविन दिशा नविन ध्येय, नविन संकल्प करत पुढील आयुष्य सर्वांना जगायचे आहे. नविन वर्षातील नवे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हे मात्र निश्चित! म्हणतात ना… ” वाळुचे कणही रगडीता तेलही गळे” माणसाच्या उभ्या आयुष्यात सदैव प्रयत्नशील राहिले तर निश्चितपणे यशाचे शिखर सहजच गाठता येते.
….चला तर मग नविन वर्ष नविन संकल्प करुयात…. जिवनात विकासाची समृद्धी अनुयात!

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सा. भुमी राजा न्युज चॅनल नांदेड परीवार…

Previous articleयावर्षी आंबा बहरला!
Next articleजिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम संपन्न!