हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
जय किसान फार्मर्स फोरम व आमची माती आमची माणसं कृषी मासिकातर्फे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारे “कृषिरत्न” हे प्रेरणा पुरस्कार राज्यातील ४० शेतकरी-कृषी उद्योजकांना जाहीर झाले असून २७ डिसेंबरला नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी ११ वाजता शेतकरी नेते व कृषी विचारवंत विजय जावंधिया, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, गोव्याचे नि. जिल्हाधिकारी प्रतापसिंह वेळीप काणकर व
इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सपत्निक सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती जय किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी दिली.
मेडल,ट्राफी, फेटा,पैठणी साडी,सन्मानपत्र, शेतकरी गौरव विशेषांक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी डॉ.पंजाबरांवांचे कार्य व सेंद्रिय शेतीवर चर्चा सत्र तसेच आमची माती आमची माणसं मासिकाच्या “शेतकरी गौरव” विशेषांकाचे प्रकाशन होणार असून प्रसिद्ध गायक- गायिका रेखा महाजन, सुखदा महाजन, तुषार वाघुळदे यांचा सुमधुर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
पुरस्कार प्राप्त शेतकरी- शिवाजी घावटे(औरंगाबाद), तानाजी पवार(कळवण,नाशिक), टि एस ऑर्गो ऑर्गेनिक प्रा. लि.(नागपूर), अमित शिंदे (डोर्लेवाडी,पुणे), राघवेंद्र फर्टिलाइजर्स प्रा. लि.(कोल्हापूर), दिनकर पाटील(पाळे खुर्द,नाशिक), दादासाहेब शिंदे(सिंदोन,औरंगाबाद), जगन्नाथ घोडे(इगतपुरी,नाशिक), भगवान क्षिरसागर(बारामती,पुणे), चंद्रकांत पाटील(नरपड,पालघर), प्रवीण जाधव(भादवण,नाशिक), परमानंद खर्डे(रायतेवाडी,संगमनेर), संजय पवार(धुळे), शिवनाथ ठोंबरे(येवला), ग्यानमल जैन(कन्नड़), अनिल दादाजी पगार(कळवण), शितल कसबे(निमोण,अहमदनगर), बाळासाहेब जाधव(वडाळीभोई,चांदवड), विलास बगाटे(यशराज पार्क,पुणे), संजय खोडे,(पिंपळगाव बसवंत), माणिक देशपांडे(जामखेड,अ.नगर), सुरज आग्रे(श्रीगोंदा), जे.के. उद्योग समुह(सांगली), अलका शिंदे(सोनगाव,राहाता), उर्मिला पाटील(मौजे सांगाव,कोल्हापूर), अक्षय कृषी फार्म(निफाड,नाशिक), महादेव भांगे(माढा,सोलापूर), तुषार पाटील(दह्याने,नाशिक), सचिन इंगळे(यावल,जळगाव), रामचंद्र कारंडे(ग्रामविकास अधिकारी, पुणे), श्रीराम शैक्षणिक विकास केंद्र( निफाड,नाशिक),
मुक्तानंद पाटील(नागद,औरंगाबाद), योगेश सुभाष पाटील(कळवण,नाशिक), सोमनाथ भिले(बारामती,पुणे), अशोक पाटील(दिंडोरी,नाशिक), मधुकर माळी(चाळीसगाव, जळगाव), सुधाकर पगार(कुंडाणे,नाशिक), लक्ष्मण शिंदे( दौंड,पुणे), दादासाहेब दराडे(सूर्यनगरी,पुणे), कैलास मोरे(कळवण,नाशिक)
कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ लामखडे,गोरक्षनाथ जाधव,भगवान खरे,निवृत्ती न्याहारकर,सुनिल निकम,मयुर गऊल,सविता जाधव,शाम गोसावी,वसंत आहेर,शाम खांडबहाले, उत्तम रौंदळ,गणेश पाटील, मिरा भोईर,नाना पाटील,बाळासाहेब मते,पुंजाजी मालुंजकर, गणेश पाटील,संदीप काळे, राजेंद्र धोंडगे,दिनेश भोसले,सुयोग जाधव,सुनिल गमे,आदिंनी केले आहे.