Home Breaking News नांदेड येथे कृषि कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन!

नांदेड येथे कृषि कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 23 डिसेंबर 2022

शासकीय सेवा करत आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळावा. यासाठी गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आयोजित, दिनांक 24 ते 26 डिसेंबर या दरम्यान कृषि कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन सायन्स कॉलेज नांदेड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात क्रिकेट, हाॅलीबाॅल, कबड्डी, खो… खो, बॅटमिंटन, धावणे, आणि सांस्कृतीक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी कार्यालयलातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चलवदे साहेब यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते – देवानंद गहिले
Next articleसंभापूर येथील ग्रामपंचायतचे सदस्य,आणि त्यांच्या नातेवाईकांनाच घरकुल योजनेचा लाभ…!!