Home Breaking News राष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते – देवानंद गहिले

राष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते – देवानंद गहिले

केंद्रीय संघटक अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र

पातुर तालुक्यातील शिर्ला येथे सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातुर यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात केले प्रतिपादन

शिबिराला विद्यार्थ्यांनी दिला प्रचंड प्रतिसाद कवी संमेलनामुळे शिबिरामध्ये आली रंगत

पातुर तालुका प्रतिनिधी

गत काही वर्षाआधी राष्ट्रीय सेवा योजनेचा लाभ हा उच्च महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत होता त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वंचित राहत होते
शासनाने गेल्या काही वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सुरू केले आहे त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा विद्यार्थी विद्यार्थिनींनी भरपूर लाभ घेऊन संधीचे सोने करावे
असे आवाहन देवानंद गहिले ज्येष्ठ पत्रकार तथा संघटक अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र यांनी केले असून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा संस्कार हा विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते असे त्यांनी प्रतिपादन केले
14 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2022 पर्यंत सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ पातूर द्वारा संचलित सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालय पातुर शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना+ 2 स्तर विशेष शिबिर 2022 -23 चे आयोजन शिर्ला येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राचे सामाजिक सभागृहामध्ये आयोजित केले होते
या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख वक्ता म्हणून देवानंद गहिले यांनी 19 डिसेंबर सोमवारी बौद्धिक सत्रामध्ये व्यसनमुक्ती आणि युवकांचा विकास या विषयावर बोलताना देवानंद गहिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याचे विद्यार्थ्यांना सांगितले यासोबत त्यांनी व्यसनमुक्ती वरील कविता चारोळ्या आणि अंधश्रद्धेवर प्रहार करताना भूत, चुडेल आणि विविध प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढून अंधश्रद्धा वाढू नये अंधश्रद्धेमुळे कशी फसगत होते आवाजांचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केल्याने विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला
याप्रसंगी बहारदार कवी संमेलनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण रावजी अंधारे यांनी “काय उपयोग झाला”
तर प्रा विठोबा गवई यांनी “माझ्या भिमाने फुलविला बाग मानवी मनाचा” आणि सुप्रसिद्ध लता फेम गायक कलावंत प्रा. करुणा गवई यांनी “बलिदानाचे कफन बांधूनी झिजला तू भिमराया”
भिमराया या गीताचे अतिशय सुंदर आवाजात गायन केले कवी संमेलनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते
यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सचिन ढोणे, प्राचार्य जे डी कंकाळ कार्यक्रमाधिकारी हर्षल रमेश ढोणे, महिला कार्यक्रमाधिकारी सौ माधुरी सचिन ढोणे, वीर पिता काशीरामजी निमकंडे, अविनाश पोहरे, जनार्दन इंगळे मेजर, निळकंठ अंधारे, राजाराम खंडारे आदींची यावेळी मंचावर उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल ढोणे कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी अजय कराळे यांनी केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर व सर्व गावकरी मंडळी शिर्ला यांनी अथक परिश्रम घेतले

Previous articleकिसान गोष्टी क्षेत्रीय दिन कार्यक्रम संपन्न
Next articleनांदेड येथे कृषि कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन!