Home Breaking News किसान गोष्टी क्षेत्रीय दिन कार्यक्रम संपन्न

किसान गोष्टी क्षेत्रीय दिन कार्यक्रम संपन्न

शेतकरी बांधवांना कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

पिंपळखुटा प्रतिनिधी

पिंपळखुटा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अकोला अंतर्गत प्रकल्प संचालक (आत्मा) अकोला आरिफ शहा, तालुका कृषी अधिकारी, पातूर धनंजय शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे पिंपळखुटा तालुका पातुर जिल्हा अकोला येथे कांदा काढणी पश्चात तंत्रज्ञान, मधमाशी पालनाचे महत्त्व या विषयावर किसान गोष्टी/ क्षेत्रीय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गजानन तुपकर यांनी कांदा काढणी व साठवणी बाबत मार्गदर्शन खादी ग्रामोद्योग चे शास्त्रज्ञ आर एस बिलबिले यांनी मधमाशी पालन याविषयी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे यांनी ॲग्रोटेक कृषी प्रदर्शनी 2022 तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक अनिल सुरवाडे यांनी केले. किरण दंदी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. किसान गोष्टी/क्षेत्रीय दिन कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गावातील कृषी मित्र गणेश बुंदे, कृषी सहाय्यक अनिल सुरवाडे गुरवारी किसान गोष्टी च्या कार्यक्रमाला पिंपळखुटा येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पिकांच्या बी बियाणे खत कीटकनाशके बुरशी येणारे रोग या बाबत चर्चा झाली आणि उत्पन्नात वाढ पाणी नियोजन खत नियोजन बी बियाणे फवारणी या सर्वच बाबी बाबत चर्चा झाली कांद्याचे बी कांद्याचे उत्पन्न लागवड पद्धत या बाबी तसेच शेतकऱ्यांची बरेच प्रश्न मार्गी लागले
कार्यक्रमाला उपस्थित अधिकारी आर एस बिलबिले जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी
गजानन पुष्कर विशेष विशेषतज्ञ धनराज शेटे तालुका कृषी अधिकारी अनिल सुरवाडे कृषी सहाय्यक
सुभाष वावकार सरपंच

गावातील शेतकरी प्रशांत यादवराव देशमुख, भगवान रामचंद्र महानकार, विनोद निरंजन वावकार, अरविंद पंजाबराव देशमुख, नारायण सिताराम रेवस्कर, नरेंद्र नरसिंगराव देशमुख, बाळू जयराम वानखडे, भगवान नारायण देशमुख, पवन मधुकर खराटे, सुभाष भगवान हरमकार, नितीन जगन्नाथ खरप, बाबुराव काशीराम सावंत, केशवराव विठ्ठलराव, देशमुख, गजानन पांडुरंग हरमकार, सुभाष सहदेवराव दादळे, गोपाल शिवराम कवळे, अमोल वसंत लाहूडकार, डिगांबर किसन माडोकार, सुनील वामनराव माडोकार, गोपाल रामदास माडोकार, सुरेश उत्तम ठोसर, संतोष तूराव देशमुख, ज्ञानेश्वर वाट, सूर्यभान सुखदेव लाहुडकार, श्रीराम परशुराम इंगळे, भीमराव शिवराम अंभोरे, संतोष किसन उगले, जगन्नाथ मोतीराम मावलकर, हरीश पंडितराव देशमुख, गणेश पंडित बुंदे, तुळशीराम नारायण खुरद, गोपाल सदाशिव पानझाडे, गोपाल मनोहर राखोडे, प्रवीण विठ्ठल मांडवकर दिलीप विठ्ठल माडोकार, निलेश वाहोकार, गजानन विठ्ठलराव देशमुख, करीम शहा चांद शहा, शेख फारुख शेख सत्तार,नासीर शहा मनवर शहा , ज्ञानेश्वर ढोले, संतोष तराडे, आदी शेतकरी उपस्थित होते

प्रतिक्रिया

पातुर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी अग्रोटेक 2022 चा लाभ घ्यावा सदर कृषी प्रदर्शन हे दिनांक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर रोजी विद्यापीठ क्रीडांगण नागपूर रोड अकोला येथे होणार आहे सदर प्रदर्शन महाराष्ट्र शासन कृषी विभाग व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित करण्यात आले आहे
धनंजय शेटे तालुका कृषी अधिकारी पातूर.

Previous articleगाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ? – ऍड.चंद्रकांत निकम
Next articleराष्ट्रीय सेवा योजनेचा संस्कार विद्यार्थ्यांचे व्यसनमुक्त सुसंस्कृत जीवन घडवते – देवानंद गहिले