Home Breaking News गाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील...

गाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ? – ऍड.चंद्रकांत निकम

गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकरांचे नाते एकमेकांना काळजा पलीकडचे जपणारे – महेंद्र पगारे

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

येवला (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत थोर समाजसुधारक गाडगेबाबांनी स्थापन केलेल्या धर्मदाय संस्था,धर्मशाळा आपल्या नातेवाईक-आप्तेष्ठी करता उभारल्या नाहीत किंबहुना त्यांना तेथे थाराही दिला नाही हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ? असा सवाल ऍड.चंद्रकांत निकम यांनी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संचालित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येथे आयोजित राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलतांना केला.
गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकरांचे नाते एकमेकांना काळजा पलीकडचे जपणारे होते व त्यांनी एकमेकांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीस पाठबळ दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पगारे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते भगवान चित्ते हे होते.ऍड.अमोल पाठारे,दीपक उन्हावणे,दिनेश कटारे,राहुल जाधव,महेंद्र पगारे,सुरेश खळे,ऍड.चंद्रकांत निकम,अशोक पगारे,विकास वाहुल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेजवळ यांनी केले.सूत्रसंचालन राजरत्न वाहुल यांनी केले तर आभार सुरेश खळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल जाधव,ललित भांबेरे,निलेश महाले,ओम पाठारे, तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ, जीवन दळे, पंकज घुगे इ.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद शेजवळ
संस्थापक
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,येवला
व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक अभ्यासिका
9822645706

Previous articleडॉ. मनोरामा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
Next articleकिसान गोष्टी क्षेत्रीय दिन कार्यक्रम संपन्न