हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
सुप्रसिद्ध सिनेगीतकर,संगीतकार,
गायक व आंबेडकरी विचारांचे प्रबोधनकार दिवंगत गीतकार विनायक दादा पाठारे यांचा प्रथम स्मृतिदिन कार्यक्रम,
त्यांना संगीतमय आदरांजली अर्पण करून डॉ.आंबेडकरनगर येथील हॉल
मध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राहुल दिवे,भरत तेजाळे,पी कुमार धनविजय,प्रा.शरद शेजवळ,
गायक सुनील खरे (मनमाड), रवींद्र महाले,डॉ.आरती गायकवाड तर अध्यक्षस्थानी गीतकार रंगराज डेंगळे हे उपस्थित होते.
प्रथम तथागत बुद्ध,छत्रपती शिवाजी
राजे,महात्मा फुले,राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर
इ.महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून, दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर धम्मामित्र सतीश साळवे,बौद्धाचार्य प्रमोद शिंदे,अनिल साळवे इ.नी पूजा विधी घेऊन त्रिसरण व पंचशिलाचे पठण केले.
प्रमुख वक्ते भरत तेजाळे,पी.कुमार,
अशोक भालेराव,गायक सुनील खरे व गायक जयपाल धिवरे, ढेंगळे इ.नी विनायक दादांच्या विविध आठवणी सांगून, संगीताची जाण व शुद्ध लेखनाविषयी त्यांच्या गीत-संगीताच्या ज्ञानाची महती सांगितली.
ह्या स्मरणदिनी त्यांची अनेक गाजलेली व प्रसिध्द असलेली आंबेडकरी व प्रबोधनात्मक गाणी
अनेक नामवंत गायकांनी गायली.त्यात चेतन लोखंडे,प्रकाश बोढारे,संदेश जगताप,शरद शेजवळ,किरणजगताप,
विजयराज निकम,रविराज जगताप,
संतोष जोंधळे,दीपक साळवे,सुनील
खरे,जयपाल धिवरे,युवराज शिंदे,
सोमनाथ गायकवाड इ.नी गायली. हरिदास भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी वादनाची साथ दिली.
याप्रसंगी रमेश लोखंडे,सुभाष राऊत,कविता कटारे,विक्रांत गांगुर्डे,
अनिल जगताप,रवींद्र महाले,विजय लोखंडे,भाऊसाहेब चव्हाण,माणिक बागुल,सतीश साळवे,आनंद महिरे इ.सह दिवंगत पाठारे यांचे कुटुंबीय,
मान्यवर व्यक्ती तसेच कवी,साहित्यिक
,गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन पाठारे यांनी,
सूत्रसंचालन अशोक भालेराव यांनी तर आभार अजय पाठारे यांनी मानले.कार्यक्रमास साहित्य कला प्रांतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
फोटो कॅप्शन….डावीकडून पी.कुमार धनाविजय, रंगराज ढेंगळे,सुनील खरे,जयपाल धिवरे,अशोक भालेराव पाहुण्यांचे स्वागत करताना प्रा.कविता कटारे