सभासद आक्रमक : विविध विषयांवर संस्था पदाधिका- यांना धरले धारेवर
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा
मो. नंबर – 8983319070
नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ( दि.18) संस्थेच्या प्रांगणात पार पडली.
संस्थेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचे शाळा व महाविद्यालयांना नावे न दिल्याने अनेक सभासदांनी नाराजी व्यक्त करत ठराव करण्याचा आग्रह धरल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेरीस या मागणीची दखल घेऊन संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी एका समिती स्थापने ची घोषणा केली. मखमलाबादला शिक्षण संस्थेने फार्मसी कॉलेजसाठी ईमारतीचे बांधकाम सुरु केले. मात्र तीन, चार वर्ष उलटूनही हे काम अर्धवट असल्याकडे सभासद गोकुल काकड़ यांनी लक्ष वेधले. एनए पर वानगी नसतांना बांधकाम कसे केले, असा प्रश्न मनोज बुरकुल यांनी उपस्थित केला.
व्ही. एन. नाईक संस्थेने विविध तालुक्यांमध्ये सुरु केलेल्या अनेक शाळाच्या जागांना बिगर शेतीच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. अनेक वर्ष उलटूनही या शाळाच्या जागांना अकृषक परवानगी न मिळाल्याने या ईमारती बेकायदेशीर ठरण्याची भीती संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केली. संचालक मंडळाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तात डीने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचनाही सभासदांनी देत आक्रमक भूमिका घेतल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला.
पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष ऐड.पी. आर. गीते, सहचिटणीस ऐड. तानाजी जायभावे, विश्वस्त, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.